घरक्रीडाIND vs NZ : पंतची पुन्हा अपयशी खेळी; सोशल मीडियावर 'वी वॉन्ट...

IND vs NZ : पंतची पुन्हा अपयशी खेळी; सोशल मीडियावर ‘वी वॉन्ट संजू’ ट्रेंड व्हायरल

Subscribe

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सुरू आहे. या सामन्यात पुन्हा ऋषभ पंतला संधी देऊन यष्टीरक्षक संजू सॅमसनला वगळण्यात आले. मात्र, या सामन्यात फलंदाजी करताना पुन्हा एकदा ऋषभ पंतची खेळी अपयशी ठरली. त्यामुळे चाहत्यांनी भारतीय संघव्यवस्थापनेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सुरू आहे. या सामन्यात पुन्हा ऋषभ पंतला संधी देऊन यष्टीरक्षक संजू सॅमसनला वगळण्यात आले. मात्र, या सामन्यात फलंदाजी करताना पुन्हा एकदा ऋषभ पंतची खेळी अपयशी ठरली. त्यामुळे चाहत्यांनी भारतीय संघव्यवस्थापनेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. शिवाय, सध्या सोशल मीडियावर ‘वी वॉन्ट संजू’ हा ट्रेंडही व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे आगामी सामन्यात भारतीय संघव्यवस्थापन संजू सॅमसनला संघात स्थान देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Ind Vs Nz 3rd Odi Rishabh Pant Team India Team Management Sanju Samson We Want Sanju)

यष्टीरक्षक ऋषभ पंत याला मर्यादित सामन्यांच्या क्रिकेटमध्ये कितीही सातत्याने संधी दिली जात असूनही, त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे तो बहुतांश सामन्यांमध्ये अपयशी ठरत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मालिकेत आणि नंतर वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात पंत फलंदाजी करताना अपयशी ठरला. तसेच, टी-20 विश्वचषकातील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्याला संधी देण्यात आली होती. त्यावेळीही त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याच्या सततच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघाच्या माजी सलामीवीर फलंदाजांनी त्याला काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

- Advertisement -

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या वनडे सामन्यात फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवन आणि शुबमन गिल हे दोघेही स्वस्तात बाद झाले. सलामीवीर बाद झाल्यानंतर भारतीय संघाची धावसंख्या सावरण्यासाठी ऋषभ पंतला सामन्यात टीकून राहणे गरजेचे होते. परंतु, पंत 16 चेंडूत केवळ 10 धावा करत झेलबाद झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताची अवस्था सध्या बिकट आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने भारतीय संघाला फलंदाजीला आमंत्रित केले. मात्र सलामीवीर शिखर धवन (28) आणि शुबमन गिल (13) फारशी काही चांगली कामगिरी करू शकले नाही. श्रेयस अय्यर एका बाजूने खिंड लढवत असताना त्याची झुंज देखील अपयशी ठरली. त्याने 59 चेंडूत 49 धावा केल्या तर मिस्टर 360 सूर्यकुमार यादव देखील अवघ्या 5 धावा करून बाद झाला. सध्या अष्टपैलू दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदर भारतासाठी किल्ला लढवत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, या सामन्यात पुन्हा एकदा संजू सॅमसनला वगळण्यात आल्याने भारतीय संघाच्या निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शिवाय, आजच्या ऋषभ पंतच्या खराब कामगिरीमुळे चाहत्यांना संजू सॅमसनचे स्मरण झाले आहे. तसेच, सोशल मीडियावरही ‘वी वॉन्ट संजू’ ट्रेन्ड सुरू झाला आहे.


हेही वाचा – Ind vs NZ : ‘पंतला आता विश्रांतीची गरज…’; संजू सॅमसनला संघातून वगळल्याने शशी थरुरांचा संताप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -