IND VS NZ : कसोटी मालिकेत बड्या खेळाडूंना विश्रांती, मुंबईकराकडे भारतीय संघाचे नेृतृत्व

दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट बोर्डातर्फे (BCCI) नव्या संघाची घोषणा करण्यात आली आहे

न्यूझीलंडचा संघ नोव्हेंबरच्या महिन्यात भारताचा दौरा करणार आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये ३ टी-२० आणि २ कसोटी सामने होणार आहेत. भारतीय क्रिकेट बोर्डातर्फे काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० मालिकेसाठीच्या नव्या संघाची घोषणा केली होती. न्यूझीलंडसोबत टी-२० सामन्यांसोबत २ कसोटी सामने देखील होणार आहेत. दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट बोर्डातर्फे (BCCI) नव्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघ कसोटी मालिका खेळणार आहे. तर सोबतच संघात बड्या चेहऱ्यांना विश्रांती देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विराट कोहलीला पहिल्या सामन्यात विश्रांती दिली आहे तर दुसऱ्या सामन्यात विराट संघाचे कर्णधार पद सांभाळणार आहे.

न्यूझीलंडसोबतच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), के.एल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयश अय्यर, ऋद्धिमान साहा, के.एस भरत, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध्द कृष्णा, तर विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार आहे आणि सामन्याचे नेतृत्वदेखील त्याच्याकडे असणार आहे.

नवीन चेहऱ्यांना संधी

न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी काही बड्या चेहऱ्यांना विश्रांती देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयश अय्यर, के. एस भरत, प्रसिध्द कृष्णा या नव्या आणि युवा चेहऱ्यांना संघात स्थान दिले आहे. तर विश्वचषकादरम्यान विश्रांती न मिळाल्याने भारतात परतलेल्या अक्षर पटेलचा देखील समावेश आहे.

या बड्या खेळाडूंना आराम

न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. दोन्हीही खेळाडू ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यांनंतर विश्वचषक खेळून आले आहेत. अशातच रोहित शर्मा देखील मागच्या काही दिवसांत सलग क्रिकेट खेळत आला आहे. पण रोहितला टी-२० चा कर्णधार केल्यामुळे त्याच्याकडे मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे बुमराह सोबत रोहितलाही कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

भारत-न्यूझीलंड मालिकेचे असे होणार सामने

१७ नोव्हेंबर पहिला टी-२० सामना (जयपुर)
१९ नोव्हेंबर दुसरा टी-२० सामना (रांची)
२१ नोव्हेंबर तिसरा टी-सामना (कोलकत्ता)
पहिला कसोटी सामना- २५-२९ नोव्हेंबर (कानपूर)
दुसरा कसोटी सामना- ३-७ डिसेंबर (मुंबई)


हे ही वाचा: T20 WC AUS VS PAK : बाय बाय पाकिस्तान, पराभवानंतर पाकिस्तान सोशल मीडियावर ट्रोल