घरICC WC 2023IND vs NZ : भारतीय संघाचा विजय वादात; न्यूझीलंड मीडियाकडून खेळपट्टीसंदर्भात आरोप

IND vs NZ : भारतीय संघाचा विजय वादात; न्यूझीलंड मीडियाकडून खेळपट्टीसंदर्भात आरोप

Subscribe

मुंबई : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला आहे. बुधवारी पार पडलेल्या सामन्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद शमीच्या 7 विकेट्सच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. यामुळे न्यूझीलंड संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. परंतु आता वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टीबाबत प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. न्यूझीलंडच्या प्रसारमाध्यमांमध्ये यावर बरीच चर्चा होत आहे. (IND vs NZ Indian Cricket Associations Victory Promise Allegations regarding gambling from New Zealand media)

न्यूझीलंडच्या मीडिया कंपनी स्टफने लिहिले आहे की, भारतीय क्रिकेट संघाने शेवटच्या क्षणी बदललेल्या खेळपट्टीवर न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, पण भारतीय संघ खेळपट्टीच्या वादात अडकला आहे. ब्रिटनच्या डेली मेल आणि ईएसपीएन क्रिकइन्फोने वृत्त दिले की, सुरुवातीला खेळपट्टी क्रमांक सातवर खेळले जाणार होते, जी वानखेडे स्टेडियमची मध्यवर्ती पट्टी आहे, जीचा साखळी फेरीत वापर झालेला नाही. परंतु दोन्ही संघांमधील सामना सहाव्या खेळपट्टीवर बदलण्यात आला. या खेळपट्टीचा दोन सामन्यांसाठी वापर झालेला होता.

- Advertisement -

हेही वाचा – ICC WC 2023: ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ विक्रम भारत रविवारी मोडीत काढणार? बनणार जगज्जेता

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या टूर्नामेंट खेळण्याच्या अटींनुसार, कोणत्याही सामन्यापूर्वी खेळपट्टीची निवड आणि तयारीसाठी संबंधित मैदान प्राधिकरण जबाबदार असते. डेली मेलने असा दावा केला की, आयसीसीचे स्वतंत्र खेळपट्टी सल्लागार अँडी ऍटकिन्सन स्पर्धेपूर्वीच्या योजनांमध्ये बदल केल्यामुळे निराश आहेत. न्यूझीलंडमधील द पोस्ट या वृत्तपत्राने लिहिले आहे की, खेळपट्टी का बदलण्यात आली, तसे करण्याचे भारताकडून काही आदेश होते का, याबाबत अधिक चौकशी व्हायला हवी.

- Advertisement -

आयसीसीने म्हटले बदल सामान्य

वानखेडेची खेळपट्टी बदलल्यामुळे काहीही अनुचित प्रकार घडला नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. आयसीसीने म्हटले की, एवढ्या प्रदीर्घ कार्यक्रमाच्या शेवटी नियोजित खेळपट्टीच्या रोटेशनमधील बदल सामान्य आहे. यापूर्वी अनेकदा असे झाले आहे. हा बदल आमच्या यजमानांसह स्थळ क्युरेटरच्या शिफारसीनुसार करण्यात आला आहे.

भारत न्यूझीलंडला कुठेही हरवू शकतो

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने उपांत्य फेरी आधीच वापरलेल्या खेळपट्ट्यांवर खेळवली जाऊ नये, असे म्हणत समर्थन दिले आहे. पण त्याने असेही म्हटले की, भारतीय संघ जबरदस्त आहे. त्यामुळे मला वाटत नाही की न्यूझीलंडने खेळपट्टीची काळजी करू नये. कारण भारत कोणत्याही खेळपट्टीवर न्यूझीलंडला हरवू शकतो.

हेही वाचा – शामीच्या ‘त्या’ गुन्ह्यासाठी दिल्ली पोलिसांनी केलं ट्वीट; मुंबई पोलिसांनीही दिलं सडेतोड उत्तर

पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनेही केले याआधी आरोप

दरम्यान, याच मैदानावर भारतीय संघाने श्रीलंका संघाला 55 धावांवर रोखले होते. यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू हसन रझा याने भारतीय गोलंदाजांना वेगळ्या प्रकारचा चेंडू दिला जातो, असा आरोप केला होता. त्याने एका पाकिस्तानी वाहिनीवर बोलताना म्हटले होते की, यावर्षी अनेक गोष्टी भारताच्या बाजूने गेल्या आहेत. मग ते रिव्यू असो किंवा आणखी काही. मोहम्मद शमी आणि सिराजची गोलंदाजी पाहा. आम्ही पण एकेकाळी खेळायचो. तेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग व्हायचा. पण इथे काही तरी वेगळे होत आहे? मला असे वाटते की चेंडू बदलला जात आहे. आयसीसी त्यांना चेंडू देत आहे की, बीसीसीआय त्यांना देत आहे हे माहित नाही. परंतु आयसीसीने याठिकाणी काय चालले आहे ते पहावे, अशी मागणी हसन रझा यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -