मुंबई : भारतीय संघाने आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघ साखळी फेरीतील सर्वच्या सर्व सामने जिंकत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. मात्र आता भारतीय संघाला बुधवारी (15 नोव्हेंबर) न्यूझीलंडशी सामना करायचा आहे. या सामन्यात भारतीय संघात एकमेव मोठा बदल होणार असल्याचे समोर येत आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात जखमी झाला होता, त्यामुळे तो खेळू शकला नाही तर अंतिम 11 जणांच्या संघात कोणाला संधी मिळणार, हे पाहावे लागेल. (IND vs NZ Indian team likely to undergo major changes in match against New Zealand Who will get a chance in Playing xi)
हेही वाचा – रोहित शर्मा विश्वचषकातील यशस्वी कर्णधार का आहे? गौतम गंभीरने सांगितलं कारण
भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहीलेला आहे. पण उपांत्य फेरीत भारतीय संघाला न्यूझीलंड संघाशी सामना करायचा आहे. यापूर्वी 2019 साली झालेल्या विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. मात्र आता भारतीय संघाला पुन्हा चुका करायच्या नाही आहेत. त्यामुळे भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे.
And then there were four…🤩
Who will be at the top of the podium on November 19?#CWC23 pic.twitter.com/i2SQ8Q7vsq
— ICC (@ICC) November 13, 2023
नेदलरलँड्सच्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला दुखापत झाली होती. झेल पकडताना चेंडू त्याच्या गळ्यावर आदळला होता. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सिराज खेळणार नसल्याची शक्यता आहे. अशावेळी सिराजच्या जागी कोणत्या खेळाडूंला संधी द्यायची हा प्रश्न कर्णधार रोहित शर्माला पडला आहे. मात्र भारतीय संघाकडे सध्या दोन अष्टपैलू खेळाडूंचे पर्याय आहे.
हेही वाचा – Mitchell Starc : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूची मोठी घोषणा
एक म्हणजे अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विन, ज्याने विश्वचषकात आतापर्यंत एकच सामना खेळला आहे. तर दुसरा पर्याय शार्दुल ठाकूरच्या रुपात आहे. कारण हे दोन्ही खेळाडू चांगली फलंदाजी करू शकतात. तसेच उपांत्य फेरीचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन असते. त्यामुळे मोहम्मद सिराज न खेळल्यास या दोघांपैकी कोणाला संधी मिळते हे पाहावे लागेले.
भारतासाठी उपांत्य फेरीचा सामना महत्त्वाचा आहे. कारण विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत अपाराजित राहलेला आहे. तसेच भारतीय संघाला 2019 ची चूक पुन्हा करायची नाही. त्यामुळे भारतीय संघात फक्त एक बदल होणार की, आणखी बदल होणार याची उत्सुकता क्रिडा चाहत्यांना आहे. मात्र भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी पाहिल्यास भारतीय संघात जास्त बदल करण्याची जोखीम रोहित शर्मा घेणार नाही.