घरICC WC 2023IND vs NZ : मोहम्मद शामीने वर्चस्व गाजवले, 7 विकेट घेत न्यूझीलंडची...

IND vs NZ : मोहम्मद शामीने वर्चस्व गाजवले, 7 विकेट घेत न्यूझीलंडची मोडली कंबर; लावली विक्रमांची माळ

Subscribe

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा अव्वल गोलंदाज मोहम्मद शामीने 9.5 षटकात 57 धावा देत 7 बळी घेत पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. यासोबतच त्याने या विश्वचषक सामन्यात अनेक विक्रमही केले.

मुंबई: भारताने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बुधवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. या शानदार सामन्यात भारतीय फलंदाजांसोबतच गोलंदाजांची कामगिरी पाहायला मिळाली. (IND vs NZ Mohammed Shami dominates takes 7 wickets and break New Zealand s back Set records)

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा अव्वल गोलंदाज मोहम्मद शामीने 9.5 षटकात 57 धावा देत 7 बळी घेत पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. यासोबतच त्याने या विश्वचषक सामन्यात अनेक विक्रमही केले.

- Advertisement -

50 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज

मोहम्मद शामीने या स्पर्धेत तीनदा 5-5 विकेट घेत एकदिवसीय विश्वचषकात 50 बळी पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. शामीने केवळ 17 विश्वचषक एकदिवसीय सामने खेळताना 51 विकेट्स घेतल्या आहेत. यासोबतच शामीने वर्ल्ड कप वनडेमध्ये 5 विकेट घेण्याची ही चौथी वेळ आहे.

शामीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 20 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची कामगिरी नोंदवली. भारताकडून आतापर्यंत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम हा सहा विकेट्सचा आहे. तर दुसरीकडे शामीने 2003 वर्ल्डकपमधील आशिष नेहराने इंग्लंडविरोधात 6 विकेट्स घेतले होते. त्याचा विक्रमही शामीने मोडीत काढला.

- Advertisement -

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील कामगिरीसह शामी हा एकदिवसीय वर्ल्ड कपच्या इतिहासात सात बळी घेणारा एकमेव भारतीय गोलंदाज ठरला. विश्वचषकाच्या बाद फेरीत ही कामगिरी करणारा शामी हा एकमेव गोलंदाज ठरला. 2014 मध्ये बांगलादेश विरुद्ध स्टुअर्ट बिन्नीने सहा विकेट्स घेत सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली होती. आज, मात्र शामीने एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीयांकडून सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवली.

सुपर फाईव्ह क्लबमध्ये शामी

शामीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सात बळी मिळवण्यासाठी केवळ पाच खेळाडूंच्या विशेष क्लबमध्ये प्रवेश केला. केवळ ग्लेन म‌ॅकग्रा, अँडी बिचेल, टिम साऊथी आणि विन्स्टन डेव्हिस यांनी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सात बळी घेतले आहेत.

शामी सामनावीर

न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीतील जबरदस्त कामगिरीसाठी मोहम्मद शमीला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. यावेळी तो म्हणाला की, माझ्यावर दिलेली जबाबदारी माझ्या मनात कायम आहे आणि मी त्याकडे पूर्ण लक्ष देतो. पहिला झेल सुटला तो फारच वाईट झालं. या विश्वचषकात चांगली कामगीरी करण्याचे स्वप्न होते. पुढचं काहीच माहीत नाही. हे चुकवायचे नव्हते.

(हेही वाचा: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडल्यावर किंग कोहली काय म्हणाला? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -