Eco friendly bappa Competition
घर क्रीडा IND vs NZ : हार्दिक पांड्या क्लीन बोल्ड; पंचांचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात

IND vs NZ : हार्दिक पांड्या क्लीन बोल्ड; पंचांचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात

Subscribe

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या 38 चेंडूत 28 धावा करून तो क्लीन बोल्ड झाला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या 38 चेंडूत 28 धावा करून तो क्लीन बोल्ड झाला. मात्र, हार्दिक पांड्या ज्या चेंडूवर बाद झाला, त्यावर सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. परिणामी हार्दिकला बाद ठरवलेला पंचांचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. (Ind Vs Nz Odi Hardik Pandya Wicket Controversy Umpire Rules In Conflict)

नेमकं काय घडलं?

- Advertisement -

38 चेंडूत 28 धावा करून अष्टपैलू हार्दिक पांड्या क्लीन बोल्ड झाला. मात्र, लॅथमच्या ग्लोव्हने बेल्सला धक्का दिला होता. त्याचा स्पर्श झाल्याने बेल्स पडल्या. लॅथमचा ग्लोव्ह चेंडूच्या अगदी जवळ पाहायला मिळाला पण तिसर्‍या अंपायरला असे वाटते की लॅथमचा बेल्स पडण्याशी काही संबंध नाही. अगदीच विचित्र निर्णय घेत त्याने हार्दिकला बोल्ड करण्याचा निर्णय दिला आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारताने चांगली सुरुवात केली आहे. या मालिकेत हार्दिक पांड्याला उपकर्णधार आहे. हार्दिक पांड्याला 40व्या षटकातील चौथ्या चेंडूवर डॅरेल मिशेलने बाद केले.

- Advertisement -

भारतीय संघाने न्यूझीलंडला 350 धावांचे लक्ष्य दिले आहे. सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने शानदार द्विशतक झळकावले. त्याने 149 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 208 धावा केल्या. त्याच्याशिवाय एकाही भारतीय फलंदाजाने फलंदाजी केली नाही. रोहित शर्माने 34, सूर्यकुमार यादवने 31 आणि हार्दिक पांड्याने 28 धावा केल्या.


हेही वाचा – IND vs NZ : सलग तीन षटकार मारत शुभमन गिलचे न्यूझीलंडसमोर दमदार द्विशतक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -