घरICC WC 2023IND vs NZ : न्यूझीलंड सामन्याआधी भारतीय संघावर दबाव; राहुल द्रविडने केले...

IND vs NZ : न्यूझीलंड सामन्याआधी भारतीय संघावर दबाव; राहुल द्रविडने केले भाष्य

Subscribe

मुंबई : भारतीय संघाने आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघ साखळी फेरीतील सर्वच्या सर्व सामने जिंकत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. मात्र आता भारतीय संघाला 15 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी सामना करायचा आहे. त्यामुळे भारतीय संघावर दबाव आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच याचे आता मिळाले आहे. (IND vs NZ Pressure on Indian team ahead of New Zealand match Commented by Rahul Dravid)

हेही वाचा – Virat Kohli Wicket viral: नेदरलँडच्या स्पिनरने कोहलीला केलं क्लीन बोल्ड; विराटनं केलं कौतुक, दिलं ‘हे’ खास गिफ्ट

- Advertisement -

2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा न्यूझीलंडने पराभव केला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा विश्वचषकाचा टप्पा असून उपांत्य फेरीत न्यूझीलंड आणि भारत आमनेसामने येणार आहेत. पण, बाद फेरीचा सामना असल्यामुळे भारतीय संघावर काही दडपण असल्याची चर्चा आहे. मात्र, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दबावाला तोंड देण्याच्या भारताच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे.

- Advertisement -

भारतीय संघ उपांत्य फेरीचे दडपण सहज हाताळेल, असा आशावाद राहुल द्रविड यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, हा महत्त्वाचा आणि बाद फेरीचा सामना असल्यामुळे काही प्रमाणात दडपण असेल हे आम्हाला मान्य करावे लागेल, परंतु मला वाटते की, आम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीने दबावाला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आमच्याच खूप आत्मविश्वास भरला असून संघाच्या दृष्टिकोनात किंवा तयारीत कोणताही बदल होणार नाही.

हेही वाचा – IND Vs NED: नेदरलँड्सविरुद्ध 9 खेळाडूंनी का केली गोलंदाजी? रोहित शर्माने सांगितलं कारण…

श्रेयस अय्यर मधल्या फळीचा कणा

राहुल द्रविड यांनी विश्वचषकातील श्रेयस अय्यरच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर समाधान व्यक्त केले. राहुल द्रविड म्हणाले की, श्रेयस अय्यर हा आमच्या मधल्या फळीचा कणा आहे आणि गेल्या 10 वर्षांपासून चौथ्या क्रमांकावर चांगला फलंदाज शोधणे आमच्यासाठी किती कठीण आहे, हे आम्हा सर्वांना माहीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -