घरक्रीडाIND VS NZ : रोहित शर्मा टी-२० चा नवा कर्णधार; नव्या चेहऱ्यांसह...

IND VS NZ : रोहित शर्मा टी-२० चा नवा कर्णधार; नव्या चेहऱ्यांसह नव्या संघाची घोषणा

Subscribe

टी-२० विश्वचषकानंतर न्यूझीलंड आणि भारतामध्ये होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे

टी-२० विश्वचषकानंतर न्यूझीलंड आणि भारतामध्ये होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. १७ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. विराट कोहलीने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता रोहितकडे टी-२० च्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. तर सोबतच नव्या चेहऱ्यांना संघात संधी देण्यात आली आहे. विराट कोहलीला न्यूझीलंडविरूध्दच्या मालिकेसाठी आराम देण्यात आला आहे. कोहलीच्या जागेवर युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडचा पहिल्या फळीतील फलंदाज म्हणून समावेश केला आहे. तर संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी के.एल राहुलकडे असणार आहे.

न्यूझीलंड सोबतच्या मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयश अय्यर, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

- Advertisement -

युवा खेळाडूंना संधी

न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० मालिकेसाठी काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ज्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली याच्यात व्यंकटेश अय्यर, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. तर दुखापतीनंतर श्रेयश अय्यरचे पुनरागमन झाले आहे. विश्वचषकासाठी निवड झालेल्या युजवेंद्र चहलचा देखील समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

या ३ खेळाडूंना दिला आराम

टी-२० मालिकेसाठी विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या तीन खेळाडूंना आराम दिला आहे. हे तीनही खेळाडू सलग क्रिकेट खेळत आले होते. हे तीनही खेळाडू ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यांनंतर विश्वचषक खेळून आले आहेत. अशातच रोहित शर्मा देखील मागच्या काही दिवसांत सलग क्रिकेट खेळत आला आहे. पण रोहितला टी-२० चा कर्णधार केल्यामुळे त्याच्याकडे मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे त्याला आराम दिला नाही. संघ निवड समितीने अद्याप कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली नाही.

भारत-न्यूझीलंड मालिकेचे असे होणार सामने

१७ नोव्हेंबर पहिला टी-२० सामना (जयपुर)
१९ नोव्हेंबर दुसरा टी-२० सामना (रांची)
२१ नोव्हेंबर तिसरा टी-सामना (कोलकत्ता)
पहिला कसोटी सामना- २५-२९ नोव्हेंबर (कानपूर)
दुसरा कसोटी सामना- ३-७ डिसेंबर (मुंबई)

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -