घरक्रीडाT20 world cup 2021 : पाकिस्तानच्या विजयाचा भारताला होणार फायदा, वाचा समीकरण

T20 world cup 2021 : पाकिस्तानच्या विजयाचा भारताला होणार फायदा, वाचा समीकरण

Subscribe

भारताच्या कट्टर स्पर्धक असलेल्या पाकिस्तानने मंगळवारी झालेल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडविरोधात आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. टी २० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंडचा पराभव करत मालिकेतील आपला दुसरा विजय नोंदवला आहे. पाकिस्तानसोबत मालिका खेळण्यासाठी नकार देणाऱ्या न्यूझीलंड संघासोबतचा बदलाही या विजयाच्या निमित्ताने पाकच्या संघाने घेतला आहे. मालिका सुरू होण्याआधीच काही तास आधी न्यूझीलंडने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती. लागोपाठ दोन सामने जिंकत पाकिस्तानच्या संघाने आता सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. न्यूझीलंड विरूद्ध पाकिस्तान सामन्यामुळे भारताच्या मालिकेतील फायद्याची अनेक समीकरणे अवलंबून होती. पाकिस्तानच्या विजयमामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळेच भारताचे टी २० मालिकेतील आव्हान कायम राखण्यात पाकिस्तानचा विजय उपयोगी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

भारताच्या टी २० मालिकेतील ग्रुपमध्ये पुढचा सामना हा न्यूझीलंडसोबत आहे. या सामन्यात भारताला विजय मिळवावाच लागणार आहे. कारण त्यानंतरचे सामने हे अफगाणिस्तान, नामीबिया आणि स्कॉटलंडसोबत आहेत. आगामी चारही सामन्यात विजय मिळवल्यास भारत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहू शकतो. तर पाकिस्तान पहिल्या स्थानावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा लढत पहायला मिळू शकते. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांतील सामन्याच्या निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

- Advertisement -

पाकिस्तानविरोधात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचा पुढचा सामना हा न्यूझीलंड संघासोबत आहे. तर पुढचे सामने हे अफगाणिस्तान, स्कॉटलंड, नामीबिया यासारख्या दुबळ्या संघांसोबत आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरोधातील सामना जिंकून भारताला सेमी फायनल गाठणे भारतासाठी सोपे आव्हान आहे. या न्यूझीलंडविरोधातील विजयानंतरच भारताचा संघ मालिकेत सहज आगेकूच करू शकतो. पाकिस्तानने भारताविरोधात १० विकेट्सने विजय मिळवला आहे. त्यामुळेच यापुढच्या काळात रन रेटच्या मुद्द्याचाही निकष लागू शकतो. जर गुणतालिकेत स्पर्धा झाली तर रनरेटच्या आधारावर संघ पुढे जातील. त्यामुळेच रनरेटच्या आधारावर सध्या अफगाणिस्तानही पिछाडीवर नाही. अफगाणिस्तानने आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये १३० धावांच्या मोठ्या फरकाने विजय नोंदवला आहे. सध्या अफगाणिस्तानचा रनरेट हा +६.५०० इतका आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानही सेमी फायनलच्या स्पर्धेत आहे हे नक्की.


हेही वाचा – T20 WC, NZ Vs PAK: पाकिस्तानचा न्यूझीलंडवर ५ विकेट्सनं विजय

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -