IND vs NZ Test series : भारतीय संघात के.एल राहुलच्या जागेवर सुर्यकुमार यादव; BCCI ने दिली माहिती

न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येलाच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे

न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येलाच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा सलामीवीर के.एल राहुलने दुखापतीच्या कारणास्तव मालिकेतून माघार घेतली आहे. दरम्यान राहुलच्या जागेवर सुर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. सुर्यकुमार इंग्ंलडच्या दौऱ्यावर देखील संघाचा हिस्सा होता. मात्र त्याला कोणत्याच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. बीसीसीआयने ट्विटच्या माध्यमातून राहुलच्या जागेवर सुर्यकुमार यादवचा संघात समावेश होणार असल्याची माहिती दिली. सोबतच के.एल राहुल न्यूझीलंडविरूध्दच्या मालिकेतून बाहेर गेल्याचे सांगितले.राहुलला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आराम देण्यात आला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या मालिकांसाठी तो ठिक व्हावा यासाठी त्याला अधिक विश्रांती दिली आहे.

मयंक आणि गिलची सलामीजोडी

सरावादरम्यान शुभमन गिल आणि मयंक अग्रवालने पारीची सुरूवात केली होती. अशातच पहिल्या कसोटी मालिकेतसुध्दा या दोघांची सलामी जोडी असण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात सुर्यकुमार यादव किंवा श्रेयश अय्यरला कसोटी करियरची सुरूवात करण्याची संधी मिळू शकते. यापूर्वीच्या नियोजनानुसार राहुल आणि मयंकने सलामी दिल्यास गिल चौथ्या क्रमांकावर खेळू शकला असता असे यापूर्वी होते, पण राहुलच्या दुखापतीनंतर गिल भारताच्या डावाची सुरुवात करेल.

के.एल राहुल कित्येक महिन्यांपासून सलग क्रिकेट खेळत आला आहे. तो इंग्लंड मालिकेपासून नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेपर्यंत सलग क्रिकेट खेळत आला आहे.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, श्रेयश अय्यर, सुर्यकुमार यादव, रिध्दिमान साहा, के.एस भारत, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध्द कृष्णा,


हे ही वाचा: Halal Meat : भारतीय खेळाडूंना मांसाहाराची सक्ती, नव्या वादाला तोंड फोडल्याने BCCI ट्रोल