घरक्रीडाT20 World Cup 2021: Ind vs Pak पाकिस्तानची भारताविरूध्दची प्लेइंग टीम जाहीर

T20 World Cup 2021: Ind vs Pak पाकिस्तानची भारताविरूध्दची प्लेइंग टीम जाहीर

Subscribe
आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषकाला सुरूवात झाली आहे. भारतीय संघ आणि पाकिस्तानचा संघ आपआपला विश्वचषकातील पहिल्या सामन्यासाठी २४ ऑक्टोबरला रविवारी आमने सामने असणार आहेत. भारतीय वेळेनुसार सामना संध्याकाळी ७.३० वाजता दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. भारताविरोधी सामन्याच्या निमित्ताने पाकिस्तान संघाने नुकतीच आपल्या १२ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. संघ निवड समितीने संघात भारताविरूध्द प्रभावी गोलंदाजांवर जास्त भर दिला आहे. (Ind vs pak 2021 Pakistan team announced 12 men squad for T20 match against india)

पाकिस्तान संघाचा भारताविरूध्दचा इतिहास जगजाहीर आहे. पाकिस्तानच्या संघाला भारतीय संघ सर्वच क्षेत्रात वरचढ आहे. अशातच पाकिस्तानसाठी विश्वकपातील भारताविरूध्दचा सामना प्रतिष्ठेचा बनला आहे, संघाने जोरदार तयारी केली आहे. पाकिस्तानी संघाचे नेतृत्व कर्णधार बाबर आझमकडे असणार आहे, तर संघात फलंदाजीची बाजू मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून संघ निवड समितीने संघात बदल केल्याचे पहायला मिळत आहे. भारतीय संघाविरूध्दच्या खराब विक्रमाला मोडीत काढण्यासाठी पाकिस्तानचा संघ खूप प्रयत्नशील आहे.

हे आहेत पाकिस्तानचे १२ खेळाडू –

पाकिस्तानच्या संघात पूर्णत: फेरबदल केल्याचे पहायला मिळत आहे. बाबर आझम ( कर्णधार ), असिफ अली, फखर झमन, हैदर अली, मोहम्मद रिझवान
 ( विकेटीकिपर ), इमरान वसीम, मोहम्मद हाफिज, शदाब खान, शोएब मलिक, हरिस रौफ, हसन अली, शाहिन शा आफ्रिदी,
पाकिस्तानचे विश्वचषक २०२१ चे वेळापत्रक
पाकिस्तान V/S भारत                २४ ऑक्टोबर
पाकिस्तान V/S न्यूझीलैंड           २६ ऑक्टोबर
पाकिस्तान  V/S अफगाणिस्तान   २९ ऑक्टोबर
पाकिस्तान   V/S नामिबिया         २ नोव्हेंबर
पाकिस्तान   V/S  स्कॉटलैंड        ७ नोव्हेंबर

भारतीय संघाची संभाव्य यादी –

विराट कोहली ( कर्णधार ), के.एल.राहुल, रोहित शर्मा, श्रेयश अय्यर, सुर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दीक पंड्या, रवीचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, ईशान किशन, रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार, दिपक चहर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, राहुल चहर, शार्दुल ठाकूर, वरूण चक्रवर्ती
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -