Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाIND vs PAK : भारतीय संघाने केला पाकिस्तानचा पराभव, दिल्ली पोलिसांनी उडवली टर

IND vs PAK : भारतीय संघाने केला पाकिस्तानचा पराभव, दिल्ली पोलिसांनी उडवली टर

Subscribe

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 6 विकेट्सनी पराभव केला. तसेच, पुन्हा एकदा विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात शतकी खेळी करत भारताचा विजय सोप्पा केला. यावेळी संपूर्ण देशभरातून भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. नेते, अभिनेते तसेच देशातील सर्वसामान्यांनी भारतीय संघाचा विजय जल्लोषात साजरा केला. पण यावेळी दिल्ली पोलिसांनी केलेल्या ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांनी पाकिस्तानला डिवचत भारतीय संघाच्या विजयाचे कौतुक केले. (IND vs PAK Delhi Police tweet viral teasing pakistan)

हेही वाचा : IND Vs PAK : भारताने सामना जिंकताच आयआयटी बाबाही फिरले, म्हणे मला ठाम विश्वास – 

दिल्ली पोलिसांनी ट्वीट करत म्हटले की, “शेजारच्या देशातून काही विचित्र आवाज येत होते. आशा आहे की फक्त टीव्हीच खराब होत आहेत. विशेष म्हणजे या शानदार विजयासह भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.” असे म्हणत पाकिस्तानला टोला लगावला आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, भारतीय संघाच्या या विजयात विराट कोहलीच्या शतकाचा मोठा वाटा होता. त्याने 51 वे एकदिवसीय शतक पूर्ण करत भारताचा विजय सोप्पा केला.

भारतीय संघाने पुन्हा एकदा ऐतिहासिक सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. स्टार फलंदाज विराट कोहलीसह अनेक शानदार खेळींच्या मदतीने भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध जिंकला. आता दिल्ली पोलिसांनीही शेजाऱ्यांच्या या पराभवाचा समाचार घेतला आहे. पोलिसांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. विजयासाठी 242 धावांचे लक्ष्य गाठताना भारताला 42 व्या षटकानंतर 4 धावांची आवश्यकता होती. खुशदिल शाहच्या षटकात, विराटने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली आणि नंतर अक्षर पटेलने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. आता भारताला जिंकण्यासाठी दोन धावांची गरज होती आणि विराटला शतक करण्यासाठी चार धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरमधून चौकार मारला आणि आपले शतक पूर्ण केले. यावेळी कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाजही ठरला.