नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामान्यात पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यावेळी भारतीय संघाच्या फिरकीपटूंनी यावेळी पाकिस्तानची दैना उडवली. यावेळी कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर, पाकिस्तानकडून सउद शकीलने 62 धावा केल्या. यावेळी त्याने कर्णधार मोहम्मद रिझवानसोबत तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. कर्णधार मोहम्मद रिझवानने 46 धावा केल्या. त्याला अक्षर पटेलने बाद करत ही भागीदारी मोडली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर पाकिस्तान संघ 49.4 षटकांत 241 धावांवर सर्वबाद झाला. (IND vs PAK India needs 242 runs to win Spinners strike)
हेही वाचा : Manikrao Kokate case : पक्षपात केला जाणार नाही, निश्चिंत राहा; राहुल नार्वेकरांनी केले आश्वस्त
नाणेफेक जिंकत पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी कर्णधार रोहित शर्माने सलग 12 वेळा एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावला आहे. पण, असे असले तरीही पाकिस्तानच्या फलंदाजांना या निर्णयाचा फायदा उचलता आला नाही. फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे पाकिस्तान 49.4 षटकात 241 धावाच केल्या. पाकिस्तानचे फलंदाज बाबर आझम (23 धावा) आणि इमाम उल हक (10 धावा) स्वस्तात माघारी परल्यानंतर सउद शकील आणि कर्णधार मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पण अक्षर पटेलने रिझवानची विकेट काढत भारतीय संघासाठी एक नवीन उमेद निर्माण केली. त्यानंतर एकाही फलंदाजाला भारतीय फिरकीसमोर तग धरता आला नाही.
सउद शकीलने अर्धशतक करत 62 धावांची खेळी केली. तर, कर्णधार मोहम्मद रिझवानने 46 धावा केल्या. त्यानंतर आलेला सलमान आगा 19 धावांवर तर तयब ताहीर हा 4 धावांवर झटपट बाद झाले. त्यानंतर आलेल्या खुशदिल शहाने एक बाजू सांभाळत 38 धावांची खेळी केली. पण त्याला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ लाभली नाही. यावेळी कुलदीप यादवने 3 विकेट घेतल्या, ज्यामध्ये त्याची एकदा हॅटट्रिकची संधी हुकली. तर, हार्दिक पांड्यानेही 8 षटकात 31 धावा देत 2 विकेट घेतल्या. तसेच, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेत पांड्या कुलदीपला चांगली साथ दिली.