नवी दिल्ली : दुबईमध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच, यजमान पाकिस्तान संघ हा स्पर्धेबाहेर जाणे आता पक्के झाले आहे. तसेच, भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. विराट कोहलीने शेवटच्या चेंडूंमध्ये चौकार मारत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 51 वे शतक साजरे केले. त्याने 111 चेंडूंमध्ये 7 चौकारांसोबत 100 नाबाद धावा केल्या. त्यामुळे भारतीयांनी पुन्हा एकदा देशभर या विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी श्रेयस अय्यरने त्याला तिसऱ्या विकेटसाठी चांगली साथ देत शतकी भागीदारी केली. (IND vs PAK India won Against Pakistan in Champions Trophy)
हेही वाचा : IND vs PAK : अशी राहिली पाकिस्तानची इनिंग, वाचा एका क्लिकवर
पाकिस्तानच्या संघाने भारतीय संघासमोर 242 धावांचे आव्हान समोर ठेवले होते. यावेळी सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने दमदार सुरुवात केली. पण शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीसमोर कर्णधार रोहित शर्मा हा पुन्हा फेल ठरला. 15 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकारासह 20 धावा करत तो बाद झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने सावध सुरुवात करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले. त्याने गिलसोबत 69 धावांची संयमी भागीदारी रचली. पण अर्धशतकापासून 4 धावा बाकी असताना गिल बाद झाला. त्याने 46 धावांचे अमूल्य योगदान दिले. त्यानंतर कोहलीने 62 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच, श्रेयस अय्यरनेही 63 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 114 धावांची विजयी भागीदारी रचली.
For his unbeaten 💯 and guiding #TeamIndia over the line, Virat Kohli is the Player of the Match 👏 🏆
Scoreboard ▶️ https://t.co/llR6bWyvZN#PAKvIND | #ChampionsTrophy | @imVkohli pic.twitter.com/vuBuKtWW06
— BCCI (@BCCI) February 23, 2025
श्रेयस अय्यर हा 56 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीमध्ये 5 चौकार आणि एक षटकार मारला. यावेळी खुशदिल शहाच्या चेंडूंवर तो बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या आला आणि त्याने एका चौकारासह 8 धावा केल्या पण तोही झटपट बाद झाला. दुसरीकडे भारतीय संघाला विजयासाठी कमी धावा बाकी असताना विराट कोहली शतक करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशामध्ये 42 व्या षटकापर्यंत भारताला विजयासाठी एक धाव हवी असताना या षटकाच्या दुसऱ्या चेंडूत स्ट्राईक आपल्याकडे घेतली आणि खुशदिल शहाच्या तिसऱ्या चेंडूंवर चौकार मारत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 51 वे शतक अगदी दणक्यात साजरे केले. बऱ्याच प्रतिक्षेनंतर एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रीडा प्रेमींना त्याचा हा अंदाज पाहायला मिळाला. याच सामन्यात विराटने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.