घर क्रीडा Ind vs pak : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस निश्चित;...

Ind vs pak : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस निश्चित; कधी ते वाचा?

Subscribe

Ind vs pak : आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) च्या सुपर-4 सामन्यामध्येही भारत-पाकिस्तान (Ind vs Pak) रविवारी (10 सप्टेंबर) पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. परंतु कोलंबोत (colombo) होणाऱ्या सामन्यावरही मुसळधार पावसाचे सावट (Heavy rain) आहे. याचपार्श्वभूमीवर आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) या मोठ्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Ind vs Pak Reserved day fixed for Indo Pak match in view of heavy rain Ever read it)

आशिया चषक 2023 च्या गट टप्प्यात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. पल्लेकेलेमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 266 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाला एक षटकही गोलंदाजी करता आली नव्हती. यानंतर नेपाळविरुद्धच्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला. परंतु डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघाचा 10 विकेट्सने विजयी घोषित केले. यामुळे भारतीय संघ सुपर-4 मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत सामना खेळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बुढ्ढा होगा… 43 वर्षीय रोहन बोपन्नाने गाठली टेनिस ग्रॅंडस्लॅमची अंतिम फेरी; आता लक्ष्य विजयाचे

कोलंबोतील बहुप्रतिक्षित आर प्रेमदासा स्टेडियमवर येत्या रविवारी( 10 सप्टेंबर) आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. परंतु पुढील दोन आठवडे हवामान खात्याकडून कोलंबोमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध सामन्याच्या दिवशी 90 टक्के पावसाची शक्यात आहे. त्यामुळे या मोठ्या सामन्यासाठी एसीसीने राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेताल आहे.

- Advertisement -

क्रिकेट पाकिस्तानच्या बातमीनुसार, जर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 10 सप्टेंबरला पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही तर हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 सप्टेंबरला सामना जिथे थांबला तिथून सुरूवात करण्यात येईल आणि पूर्ण होईल. परंतु एसीसीच्या या निर्णयामुले भारतीय संघाला एकामागून एक सामने खेळावे लागणार आहेत. आशिया चषक 2023 च्या निश्चित वेळापत्रकानुसार भारतीय संघाला 12 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध सामना खेळायचा आहे.

हेही वाचा – UIDAI ‘या’ वर्षाच्या शेवटपर्यंत विनामूल्य आधारकार्ड करा अपडेट

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठीच राखीव दिवस

कोलंबोमध्ये पुढील दोन आठवडे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र सुपर-4 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठीच एसीसीने राखीव दिवस ठेवण्याच निर्णय घेतला आहेत. अशापरिस्थितीत पावसामुळे सुपर-4 मधील इतर सामन्यांवर परिणाम झाल्यास ते रद्द करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याव्यतिरिक्त फक्त आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यासाठी एसीसीने राखीव दिवस ठेवला आहे.

जसप्रीत बुमराह, केएल राहुलचे होणार पुनरागमन

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळल्यानंतर त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी भारतात परतला होता. यामुळे त्याला नेपाळविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले होते. पण आता तो सुपर-4 सामन्यासाठी श्रीलंकेत परतला असून पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. याशिवाय भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलनेही फिटनेस चाचणी उत्तीर्ण करत भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्यामुळे तो आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार का? हे पाहावे लागेल. जर केएल राहुलला भारतीय संघात खेळण्याची संधी दिली तर इशान किशनला बाहेर बसावे लागेल.

- Advertisment -