नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकदिवसीय सामना सुरू आहे. अशामध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. यावरून पुन्हा एकदा भारतीय संघाने नाणेफेक हरल्यानंतर सामना जिंकणार अशी चर्चा सुरू झाली. अशामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये झालेल्या भारतीय संघांच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशविरोधात नाणेफेक हरली असली तरी सामना जिंकला. अशामध्ये नाणेफेक हरल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतीय संघ सामना जिंकणार अशी चर्चा सुरू झाली. (IND vs PAK Team India losses in toss and wins match)
हेही वाचा : Champions Trophy 2025 : पाकिस्तानचे आव्हान रमजानपर्यंत टिकले तरी खूप…, मोहम्मद हफिजचा टोला
असा आहे रेकॉर्ड
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावण्याची ही सलग 12 वी वेळ ठरली असून एक नवा विक्रम भारताच्या नावावर जमा झाला आहे. रोहित शर्माने 15 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या सामन्यात शेवटची नाणेफेक जिंकली होती. जागतिक एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सलग 11 वेळा नाणेफेक गमावण्याचा विक्रम हा नेदरलँड्स संघाच्या नावावर होता. त्यांनी मार्च 2011 ते ऑगस्ट 2013 दरम्यान सलग 11 वेळा नाणेफेक गमावली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान पाच वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये पाकिस्तानने भारतीय संघाला तीन वेळा पराभूत केले आहे. पाकिस्तानी संघाने 2004 मध्ये इंग्लंडमध्ये, 2009 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि 2017 मध्ये लंडनमधील ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवला होता. दोन्ही देशांदरम्यान एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 135 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने 57 वेळा तर पाकिस्तानने 73 वेळा बाजी मारली. 5 सामन्यांचे निकाल जाहीर होऊ शकले नाहीत.