घरक्रीडाT20 WC : Ind vs Pak High Voltage सामन्याचे असे पहा लाइव...

T20 WC : Ind vs Pak High Voltage सामन्याचे असे पहा लाइव कव्हरेज

Subscribe
भारतीय संघ आज आपला विश्वचषकातील सलामीचा सामना खेळणार आहे. भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरूध्द विश्वचषकातील पहिला सामना खेळून मोहिमेची सुरूवात करेल. या महालढतीकडे जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे, या सामन्याची सर्वत्र चर्चा रंगली असून सोशल मिडीयावर क्रिकेट प्रेमींच्या अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघ विश्वकप स्पर्धेत कधीच पाकिस्तान कडून पराभूत झाला नाही. हाच विक्रम कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल, तर बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघ आपल्या पराभवाच्या इतिहासाला मोडित काढण्यासाठी मैदानात उतरेल.

भारत V/S पाकिस्तान, कधी आणि कुठे होणार सामना ?

टी ट्वेंटी विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवारी, २४ ऑक्टोबरला आमनेसामने येतील. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. नाणेफेक सायंकाळी ७ वाजता पार पडेल.

लाइव्ह कव्हरेज कसे पहाल ? 

भारत पाकिस्तान सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सच्या वाहिनीवर पाहता येणार आहे. इग्रंजी आणि हिंदी व्यतिरिक्त, इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील पाहता येणार आहे. तसेच सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण डिस्ने प्लस हॉटस्टारवर ( Disney+Hostar ) पाहता येणार आहे.

भारताचे सामन्यात असू शकते वर्चस्व..

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे तत्पुर्वी, भारताच्या दृष्टीकोनातून जमेची बाब म्हणजे भारतीय संघाने आपल्या दोन्ही सराव सामन्यांत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लैड सारख्या बलाढ्य संघाना पराभूत केल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावर आहे.

सराव सामन्यातील पाकिस्तानची कामगिरी..

पाकिस्तानी संघाने आपले दोन सराव सामने खेळले आहेत त्यात त्यांचा एका सामन्यांत विजय झाला तर दुसऱ्यात सामन्यात पराभव झाला. पाकिस्तानने एका सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पाकिस्तानचा पराभव झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -