घरक्रीडाIndia vs Pakistan T20 World Cup 2021: भारत पाकमध्ये तूर्तास मालिका अशक्य...

India vs Pakistan T20 World Cup 2021: भारत पाकमध्ये तूर्तास मालिका अशक्य – रमीझ राजा

Subscribe

भारत आणि पाकिस्तान या दोन संघात सद्यस्थितीला कोणतीही मालिका अपेक्षित नसल्याचा खुलासा नवनियुक्त पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन रमीज राजा यांनी स्पष्ट केले. सध्या भारत पाकिस्तान मालिका हे उदिष्ट नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. या मालिकांबाबत सध्या कोणतीही घाई नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील डोमेस्टिक क्रिकेटचे सर्कीट हाच सध्याचा फोकस असल्याचे त्यांनी सांगितले. रमीज राजा यांची बिनविरोध निवडणूक झाली. देशातील क्रीडा क्षेत्रात क्रिकेट बोर्डाचा चेअरमन असणे हे सर्वात आव्हानात्मक काम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. येत्या २४ ऑक्टोबर रोजी असणाऱ्या भारत पाकिस्तान संघादरम्यानचा सामना हा सर्वोच्च असा मालिकेतील सामना असेल. टी २० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघातील लढत ही संपुर्ण टूर्नामेंटमधील चुरशीची लढत असेल असेही ते म्हणाले. (Ind vs pakistan 2021 twenty 20 match will be shows topper says PCB chairman ramiz raja)

देशातील हे सर्वात मोठे आव्हान असून अनेक पातळीवर होकार आल्यानंतरच पंतप्रधान इम्रान खान यांनी मला हे आव्हानात्मक काम दिल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदे दरम्यान इम्रान खान यांनी आपल्याला ही संधी कशी मिळाली याबाबतचीही घोषणा केली. भारत आणि पाकिस्तान या राष्ट्रांमध्ये सामन्यांच्या बाबतीत विचारल्यावर सध्या कोणतेही नियोजन नसल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सध्या क्रिकेटचे मॉडेल हे राजकारणाने दुषित झाले आहे. सध्या क्रिकेटच्या स्पर्धांच्या बाबतीत जैसे थे अशीच स्थिती आहे. पण भारत पाकिस्तान संघातील सामन्यांपेक्षा सध्या स्थानिक पातळीवर सामने खेळवण्याचा आमचा आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात होणाऱ्या सामन्यांच्या निमित्ताने डीआरएस पद्धतीवरही त्यांनी टिप्पणी केली आहे. सध्याच्या डीआरएस पद्धतीच्या बाबतीत थोडा गोंधळ आहे. या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. देशातील स्थानिक पातळीवरील क्रिकेटसाठी चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसिम खान यांना कायम ठेवण्याच्या मुद्द्यावर राजा म्हणाले की संस्थेच्या अंतर्गत विषयांना सार्वजनिक ठिकाणी चर्चेत आणणे योग्य नाही.

देशाच्या संघाने कोणत्याही निडरपणे क्रिकेट खेळावे अशी अपेक्षा आहे. सध्याच्या अडचणी पाहता आणि संघाची कामगिरी पाहता खेळाडूंनी सध्या आपल्या संघातील स्थानाची चिंता करू नये. फक्त निडरपणे खेळ करावा अशीच अपेक्षा आहे. माझ्या नेतृत्वात किती यश आणि अपयश येईल हे सांगता येत नाही. पण जागतिक पातळीवर क्रिकेट खेळताना आपली मानसिकता बदलायला हवी, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

रमीझ राजा यांच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या संघाने १८ कसोटी सामने आणि १२ एकदिवसीय सामने खेळले. रमीझ राजा यांनी २५५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर एकुण ८ हजार ६७४ धावा काढल्या आहेत. १९८४ च्या १९९७ या कालावधीत आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी योगदान दिले आहे. २००३ ते २००४ या कालावधीत पाकिस्तान संघाचे नेतृत्व हे आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीमध्ये केले आहे. सध्या एमसीसीच्या वर्ल्ड क्रिकेट कमिटीमध्ये ते काम करत आहेत. पाकिस्तान संघातील निवृत्तीनंतर अनेक वर्षे त्यांनी क्रिकेट समालोचक म्हणून काम पाहिले.


हेही वाचा – NZ VS PAK : तब्बल १८ वर्षांनी न्यूझीलॅंड संघ पाकिस्तानात


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -