भारतासाठी ‘करो या मरो’ सामना; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ‘वनडे’साठी संभाव्य संघ

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात आज दुसरा वनडे सामना होणार आहे. आजचा सामना भारतासाठी महत्वाचा असून, करो या मरोची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय संघाला वनडे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात आज दुसरा वनडे सामना होणार आहे. आजचा सामना भारतासाठी महत्वाचा असून, करो या मरोची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय संघाला वनडे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात अनेक बदल होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. (ind vs sa 2nd odi playing xi prediction player list)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आवेश खान यांना प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले. तो T20 वर्ल्ड कपच्या स्टँडबाय लिस्टमध्ये आहे. त्यामुळे त्याला फलंदाजीत पुढे जाऊन कामगिरी करावी लागणार आहे. दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडलेल्या दीपक चहरच्या जागी शनिवारी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करण्यात आला.

याबाबत बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे. “इंदूरमधील शेवटच्या टी-20 सामन्यादरम्यान दीपक चहरच्या पाठीला दुखापत झाली. लखनऊमध्ये तो प्लेइंग 11चा भाग नव्हता. आता तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असेल. चहर टी-२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंच्या यादीत आहे. त्याच्या जागी 23 वर्षीय सुंदर संघात खेळणार आहे. सुंदरने फेब्रुवारीमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. तोही दुखापतीतून सावरला आहे. सुंदरने भारतासाठी 4 कसोटी, 4 एकदिवसीय आणि 31 टी-20 सामने खेळले आहेत”, असे बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिकेत वाचवण्यासाठी टीम इंडियाला रविवारी करा किंवा मरोचा दुसरा वनडे जिंकावा लागेल. रांचीमध्ये पराभूत झाल्यास भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर सलग दुसरी मालिका गमावेल. यापूर्वी 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतीय भूमीवर पाच सामन्यांची मालिका 3-2 अशी जिंकली होती. भारतीय संघाला 12 वर्षांपासून घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका जिंकण्यात यश आले आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11

भारत : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, रवी बिश्नोई, कुलदीप यादव आणि आवेश खान.

दक्षिण आफ्रिका : येनेमन मलान, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी.


हेही वाचा – सौरव गांगुली BCCI चे अध्यक्षपद सोडण्याची शक्यता; ‘या’ माजी खेळाडूच्या नावाची चर्चा