घरक्रीडा...आणि रोहित शर्मा चाहत्यामुळे जमिनीवर पडला

…आणि रोहित शर्मा चाहत्यामुळे जमिनीवर पडला

Subscribe

सामना सुरु असताना भर मैदानात चाहते शिरल्याच्या अनेक घटना याअगोदरही बऱ्याचदा घडल्या आहेत. या घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून एक चाहता मैदानात शिरला आणि तो रोहित शर्माचा पाय पडण्यासाठी खाली वाकला. चाहता अचानक आपल्याकडे धावत आल्याने रोहित शर्मा गोंधळात पडला. तो बाजूला सरकत असताना चाहता त्याला नमस्कार करण्यासाठी खाली वाकला आणि भेदरलेल्या रोहित शर्माला आपला तोल न सावरता आल्यामुळे जमिनीवर पडला. या घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानात सुरु आहे. आज हा सामना सुरु असताना अचानक चाहता सुरक्षा रक्षकांना न जुमानता मैदानात शिरला. मैदानात रोहित शर्मा फिल्डिंग करत होता. त्यावेळी तो चाहता नमस्कार करायला खाली वाकला. त्याने रोहितच्या पायला स्पर्श केला आणि रोहितचा तोल सूटला, रोहित शर्मा जमिनीवर पडला. भारत आणि दक्षिण आफ्रिकेसामन्या दरम्यान अशी घटना घडणारी ही पहिली वेळ नाही. याअगोदरही दोन वेळा अशा घटना घडल्या आहेत. विझाग येथे पहिल्यांदा असाच प्रकार घडला होता. दोन चाहत्यांनी विराट सोबत सेल्फी काढण्याचा प्रयतन केला होत. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेसोबतच्या दुसऱ्या टी ट्वेटी सामन्यादरम्यानही असाच काहीसा प्रकार वाढला आहे. वारंवार असे प्रकार वाढत असल्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -