घरक्रीडाIND vs SA : कसोटी मालिकेपूर्वी यजमान संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे हा...

IND vs SA : कसोटी मालिकेपूर्वी यजमान संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे हा स्टार गोलंदाज बाहेर

Subscribe

भारताविरूध्द २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेच्या पूर्वसंध्येलाच आफ्रिकन संघाला मोठा झटका बसला आहे

भारताविरूध्द २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेच्या पूर्वसंध्येलाच आफ्रिकन संघाला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्किया भारताविरूध्द होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर गेला आहे. एनरिक नॉर्कियाचा कसोटी संघात समावेश होण्याच्या अगोदर पासून तो दुखापतीचा सामना करत होता. मात्र कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला नॉर्किया त्याच्या दुखापतीतून सावरू शकला नाही. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिका संघातून बाहेर व्हावे लागले आहे. लक्षणीय बाब म्हणजे नॉर्किया आफ्रिकन गोलंदाजीची महत्त्वाची बाजू आहे. कगिसो रबाडा सोबत मिळून त्याने अनेक सामन्यांत आफ्रिकन संघाला विजय मिळवून दिला आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले की, “एनरिक नॉर्किया यापूर्वीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. कोविड-१९ मुळे नॉर्कियाच्या जागी इतर कोणत्याही खेळाडूच्या नावाची घोषणा केली जाणार नाही.”

- Advertisement -

लक्षणीय बाब म्हणजे दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराचे सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे दोन्हीही संघ एका सुरक्षित बायो-बबल वातावरणात राहत आहेत. एनरिक नॉर्कियाने या वर्षी ५ कसोटी सामन्यांत २५ बळी घेतले आहेत. २८ वर्षीय नॉर्किया मोठ्या कालावधीपासून आपल्या दुखापतीने ग्रस्त आहे. त्याने आफ्रिकेसाठी आतापर्यंत १२ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४७ बळी पटकावले आहेत. नॉर्कियाने कसोटी क्रिकेटमधील पदार्पण भारताविरूध्द २०१९ मध्ये पुण्यात केले होते.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच एनरिक नॉर्कियाला त्याची फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कायम ठेवले होते. नॉर्किया त्याच्या चमकदार कामगिरीमुळे दिल्लीसाठी महत्त्वाचा खेळाडू बनला आहे.


हे ही वाचा: http://IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका मालिका प्रेक्षकांशिवाय खेळवली जाणार; स्टेडियममध्ये प्रवेश बंदी


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -