घरक्रीडाIND vs SA : भारतीय संघाला मोठा झटका, दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या मालिकेत हा...

IND vs SA : भारतीय संघाला मोठा झटका, दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या मालिकेत हा दिग्गज खेळाडू नसण्याची चिन्हं

Subscribe

भारतीय संघ पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे या दौऱ्यात ३ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ४ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे

भारतीय संघ पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे या दौऱ्यात ३ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ४ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. अशातच या दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे संघाचा आक्रमक खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर खेळणार नाही. हा दौरा १७ डिसेंबरपासून ते २६ जानेवारी पर्यंत असणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता नाकारली जात आहे. माहितीनुसार हार्दिक पांड्याने निवडीसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला अहवाल देण्याबरोबरच त्याचा फिटनेस सिद्ध करावा अशी निवडकर्त्यांनी सांगितले आहे.

हार्दिक पांड्याला विश्वचषकातील पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यात दुखापत झाली होती. न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० मालिकेपूर्वी त्याचा संघात समावेश होण्याची चर्चा सुरू होती पण त्याची दुखापत गंभीर असल्याने तो खेळू शकला नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार दुखापत ठिक होण्यासाठी त्याला आराम करावा लागणार आहे कारण त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला अहवाल पाठवायचा आहे. त्याच्या अहवालाच्या आधारावर त्याला भारतीय संघात समाविष्ट करायचे की नाही यावर निर्णय होईल. अधिकाऱ्यांनी असे देखील सांगितले की सध्या तरी हार्दिक पांड्या पूर्णपणे ठीक झाला नाही आणि हा काळजीचा विषय आहे.

- Advertisement -

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अधिक सांगितले की, “या क्षणी तो कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी तंदुरूस्त नाही. त्याला दुखापतीतून सावरायला हवे, आणि आम्हाला त्या गोष्टी पुन्हा करायच्या नाहीत ज्या विश्वचषकाच्या पूर्वी झाल्या. जर तो ठिक झाला तर त्याचा समावेश टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी केला जाऊ शकतो”.


हे ही वाचा: Champions trophy 2025 : भारतीय संघ पाकिस्तानला जाणार?; icc चेअरमन ग्रेग बार्कल यांचे मोठे वक्तव्य

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -