घरक्रीडाT20 विश्वचषकासाठी दिनेश कार्तिकपेक्षा 'हा' खेळाडू आफ्रिकेसाठी ठरू शकतो घातक

T20 विश्वचषकासाठी दिनेश कार्तिकपेक्षा ‘हा’ खेळाडू आफ्रिकेसाठी ठरू शकतो घातक

Subscribe

भारताचा वेगवान फलंदाज दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली आहे. दिनेश कार्तिक ३७ वर्षांचा झाला आहे. यावेळी टी-२० वर्ल्डकपसाठी (T-20 WorldCup) दिनेश कार्तिकच्या व्यतिरिक्त आयपीएल २०२२ मधील (IPL 2022) एक स्टार आणि फिनिशर खेळाडू संघासाठी निवडला जाऊ शकतो. हा खेळाडू आपल्या गोलंदाजीतून सामन्याचा संपूर्णच मार्ग बदलून टाकतो. या खेळाडूने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळे हा खेळाडू दक्षिण आफ्रिकेसाठी घातक ठरू शकतो.

या खेळाडूला मिळू शकते संधी

राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) चांगली कामगिरी केली आहे. त्याने गुजरात टायटन्ससाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले. IPL 2022 मध्ये त्याने गुजरात टायटन्ससाठी १६ सामन्यात २१७ धावा केल्या. तो गुजरातसाठी सर्वात मोठा मॅच फिनिशर म्हणून खेळाडू ठरला आहे. राहुल तेवतियाने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात आणि ओडियन स्मिथच्या शेवटच्या षट्कात लागोपाठ दोन चेंडूत २ षटकार मारुन संघाला विजय मिळवून दिला.

- Advertisement -

मेगा लिलावात फळफळलं नशीब

IPL 2022 मेगा लिलावात, राहुल तेवतियाला गुजरात टायटन्सने ९ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. पूर्वी तेवतिया राजस्थान रॉयल्सकडून खेळत असे. राहुल तेवतियाने आयपीएलच्या ६४ सामन्यात १ हजार ९६ धावा केल्या आहेत. राहुलचा फॉर्म उत्तम असूनही निवडकर्त्यांनी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी दिली नाही.

टी-२० विश्वचषकात बजावू शकतो महत्त्वाची भूमिका

आफ्रिकन संघाविरुद्ध निवड समितीने दिनेश कार्तिकची संघात निवड केली आहे. दिनेश कार्तिक ३७ वर्षांचा झाला आहे. यावेळी राहुल तेवतियाची चपळता मैदानावर निर्माण झाली आहे. भविष्यात टी-२० विश्वचषकात तेवतिया महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

- Advertisement -

धोनीची अनुपस्थिती भरून काढू शकतो

जेव्हापासून महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) निवृत्ती घेतली आहे. टीम इंडियाला अद्यापही फिनिशर सापडलेला नाहीये. काही काळ निवडकर्त्यांनी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि व्यंकटेश अय्यर यांचा प्रयत्न केला, पण दोघेही अयशस्वी ठरले. परंतु आता राहुल तेवतिया फिनिशरची उणीव भरून काढू शकतो.


हेही वाचा : रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्फराज खानची तुफानी खेळी; पाच इनिंगमध्ये केल्या ७०४ धावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -