घरक्रीडाIND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका मालिका प्रेक्षकांशिवाय खेळवली जाणार; स्टेडियममध्ये प्रवेश...

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका मालिका प्रेक्षकांशिवाय खेळवली जाणार; स्टेडियममध्ये प्रवेश बंदी

Subscribe

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे आणि यजमान संघाविरूध्द होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे आणि यजमान संघाविरूध्द होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. भारतीय संघाला या दौऱ्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका आणि ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. सोबतच काही टी-२० सामने देखील होणार आहेत. दरम्यान मालिकेपूर्वीच कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराने दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाची चिंता वाढवली आहे. याच कारणामुळे आफ्रिकन बोर्ड कोणत्याही प्रकारचा धाडसी निर्णय घेऊ शकत नाही. अशातच क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने आगामी मालिका पाहता काही घरच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत तर काही पुढे ढकलल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ओमिक्रॉनचे संकट डोळ्यासमोर ठेवून पूर्ण मालिकेदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीवर निर्बंध लावले आहेत. म्हणजेच आगामी मालिकेसाठी तिकिटांची विक्री होणार नाही.

- Advertisement -

आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने याबाबत ट्विटच्या माध्यमातून अधिकृत घोषणा केली. आफ्रिकन बोर्डाने याबाबत माहिती देताना सांगितले की, “दक्षिण आफ्रिकेत कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे उल्लंघन आणि बायो-बबल वातावरणाचे नुकसान टाळण्यासाठी दोन्ही क्रिकेट बोर्डांनी घेतलेला हा संयुक्त निर्णय आहे.”

- Advertisement -

यापूर्वी एक दिवसाअगोदर क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने मंजासी सुपर लीग २०२१ च्या हंगामाला देखील रद्द केले होते. लीगच्या तिसऱ्या हंगामाचे आयोजन फेब्रुवारी २०२२ ला होणार होते दरम्यान या स्पर्धेला दुसऱ्यांदा रद्द करावे लागले. तर बोर्डाने कसोटी मालिका पाहता सर्व घरच्या स्पर्धांना रद्द केले आहे.


हे ही वाचा: http://Ashes Series 2021-22 : बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्कॉट बोलंडचा समावेश; हा स्टार गोलंदाज होऊ शकतो बाहेर


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -