IND vs SA : आफ्रिकन कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; रोहितकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये २६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये २६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. दरम्यान कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ भारतीय संघानेही आपल्या संघाची घोषणा केली आहे. अजिंक्य रहाणेचा उपकर्णधारपदावरून पत्ता कट झाला असून भारतीय संघाच्या उपकर्णधार पदाची धुरा हिटमॅन रोहित शर्माकडे असणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये एकूण तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या रहाणेला संघात स्थान दिले आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी १८ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होणारी ही कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे.

दरम्यान, आफ्रिका दौऱ्यातही भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटी मालिकेत चमकदार खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यर आणि मयंक अग्रवालला संघात कायम ठेवले आहे. तर ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. भारतीय संघ पुन्हा एकदा कोहलीच्या नेतृत्वात सज्ज झाला आहे. सलामीवीर के.एल राहुलचे दुखापतीनंतर संघात पुनरागमन झाल्याने भारतीय संघाची फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे.

रोहितकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माकडे उपकर्णधारपदाची धुरा असणार आहे. दरम्यान आफ्रिकन मालिकेसाठी रोहितकडे एकदिवसीय सामन्यांचे देखील कर्णधार असणार असल्याची अधिकृत माहिती बीसीसीआयने दिली आहे. लक्षणीय बाब म्हणजे टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी-२० च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे आली होती. मात्र रोहितकडे आताच्या घडीला टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपद आहे. त्यात कसोटी सामन्यांसाठी मिळालेली उपर्णधारपदाची धुरा त्यामुळे हिटमॅन शर्माकडे तिहेरी जबाबदारी असणार आहे.

भारताचा संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के.एल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, ऋध्दिमान साहा, रवीचंद्रन अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज,

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका

पहिला सामना – २६-३० डिसेंबर, सेंचुरियन
दुसरा सामना – ३-७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरा सामना – ११-१५ जानेवारी, केपटाउन


हे ही वाचा:  http://BAN vs PAK : पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यातही मारली बाजी; २-० ने मालिकेवर केला कब्जा