IND vs SA : जोहान्सबर्ग कसोटीत भारतापुढे आव्हानांचा डोंगर; आता ‘या’ गोलंदाजाला झाली दुखापत

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आपली चौथी ओवर टाकताना हॅमस्ट्रिंगवर ताण आल्यामुळे मैदानातून माघारी परतावं लागलं होतं. ज्यावेळी सिराज आपली शेवटची ओव्हर टाकत होता, त्यावेळी त्याला ही दुखापत झाली होती. दुखापतीमुळं सिराजला मैदातून माघारी परतावं लागलं.

mohammed siraj
mohammed siraj

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामने सुरू असून, दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात येतोय. या सामन्यादरम्यान टीम इंडियातील काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे टीम इंडियाला काहीशा अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा सामना संपण्यापूर्वी टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आपली चौथी ओवर टाकताना हॅमस्ट्रिंगवर ताण आल्यामुळे मैदानातून माघारी परतावं लागलं होतं. ज्यावेळी सिराज आपली शेवटची ओव्हर टाकत होता, त्यावेळी त्याला ही दुखापत झाली होती. दुखापतीमुळं सिराजला मैदानातून माघारी परतावं लागलं.

आपला रन-अप घेतल्यानंतर तो क्रिजवर बॉल टाकण्यासाठी पोहोचला होता. पण त्याला असह्य वेदना जाणवू लागल्या, त्यामुळे तो आपली ओव्हर टाकू शकला नाही. सिराजला होणारा त्रास पाहून फिजिओ थेरपिस्ट मैदानावरच पोहोचले. त्यानंतर सिराज मैदानातून माघारी परतला. त्यानंतर शिल्लक राहिलेली ओव्हर शार्दुल ठाकूरनं पूर्ण केली. दरम्यान, बीसीसीआयकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

भारतीय संघ अवघ्या 202 धावांवर गारद

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जोहान्सबर्ग कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ अवघ्या 202 धावांवर गारद झाला होता. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचीही पहिल्या डावात चांगली सुरुवात झालेली नाही आणि चौथ्या षटकातच संघाने पहिली विकेट गमावली. मात्र, कर्णधार डीन एल्गर आणि कीगन पीटरसन यांनी डाव सांभाळला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोघांनीही एकही विकेट पडू दिली नाही आणि दक्षिण आफ्रिकेने 35 धावा केल्यात. भारत अजूनही 167 धावांनी पुढे आहे आणि त्यांना आज दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित 9 विकेट मिळवायच्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्याकडे लोकांचं लक्ष लागलंय.