IND vs SA Playing XI: तिसऱ्या टेस्टसाठी प्लेइंग इलेव्हन काय? पाच माजी खेळाडूंच्या टीममध्ये कोण इन कोण आऊट?

सिराजच्या जागी उमेश यादव किंवा इशांत शर्माचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. दुसरीकडे, उमेश यादवच्या आधी ईशांतला संघात संधी दिली पाहिजे असे एमएसके प्रसाद आणि माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांचे मत आहे.

IND vs SA Playing XI Ind vs sa umesh yadav ishant sharma in team harbhajan singh and veteran player makes playing 11
IND vs SA Playing XI: तिसऱ्या टेस्टपूर्वीच पाच खेळाडूंनी बनवली टीम, ईशांत शर्मा इन विहारी संघातून बाहेर

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत शेवटचा सामना मंगळवारी केपटाउन येथे खेळवण्यात येणार आहे. सर्वाधिक माजी खेळाडूंनी आपली प्लेइंग इलेव्हन टीम तयार केली असून सर्वाधिक खेळाडूंनी संघात ईशांत शर्माला स्थान दिलं आहे. मात्र हनुमा तिवारीला संघात घेतलं नाही. काही खेळाडूंनी हनुमा तिवारी आणि उमेश यादवला संघात घेतलं आहे. प्रज्ञान ओझाने ऋषभ पंतच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जर सर्व खेळाडूंच्या टीमला पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ती म्हणजे ईशांत शर्माचे संघातील स्थान निश्चित झालं आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेल्या सिराजच्या जागी ईशांत शर्माला संघात घेऊ शकतात.

वसीम जाफरने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम तयार केली आहे. या टीममध्ये सिराजच्या जागी उमेश यादवला संधी दिली आहे. यापूर्वीदेखील जाफरने शार्दूल ठाकुरच्या जागी उमेश यादवला संधी दिली होती. शार्दुलने एका डावामध्ये ७ विकेट घेऊन आपले संघातील स्थान पक्के केले आहे. सिराजच्या जागीसुद्धा जाफरने उमेश यादवला संधी दिली आहे. अशी आहे वसीम जाफरची प्लेइंग इलेव्हन केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (डब्ल्यूके), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह.

भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंह म्हाला की, आफ्रिकाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून अजिंक्य रहाणेला संघाबाहेर ठेवणं योग्य नाही. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर संघातून बाहेर होण्याची टांगती तलवार आहे. परंतु दुसऱ्या कसोटीमध्ये दुसऱ्या डावात दोन्ही खेळाडूंनी धावा केल्या आहेत. तसेच हरभजनने म्हटलं आहे की, रहाणेने आपले अर्धशकांपैकी एका शतकाचे शतकात रुपांत करावे यामुळे आत्मविश्वास वाढेल.

भारताचा माजी खेळाडू प्रज्ञान ओझाने म्हटलं आहे की, जर सिराज खेळू शकत नसेल तर त्याच्या जागी ईशांत शर्माला संधी दिली पाहिजे. जर ईशांत शर्माला संधी दिली नाही तर आश्चर्यजनक असेल. तसेच विराट कोहलीसाठी जागा करायची असेल तर हनुमा विहारीला संघाबाहेर करावं लागेल. तर ऋषभ पंतबाबत बोलताना ओझा म्हणाला की, पंतने आपल्या फलंदाजीच्या निवडीने स्वतःला अडचणीत आणले आहे. साहा विकेटकीपर म्हणून भारतासाठी प्राथमिक निवड असेल असेही ओझाने सांगितले.

विराट कोहली तिसऱ्या कसोटीत फिट असल्यास हनुमा विहारीऐवजी भारतीय संघातून अजिंक्य रहाणेला वगळले पाहिजे असे गौतम गंभीरने म्हटलं आहे. विहारी आयपीएल खेळत नाही आणि बहुतेक वेळे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. तो भारतासाठी कसोटीत महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याला आणखी संधी मिळाली पाहिजे. रहाणेला यापुर्वीच एक संधी देण्यात आली होती असे गौतम गंभीर म्हणाला आहे.

आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी दीप दासगुप्ता आणि एमएसके प्रसाद यांनी इशांत शर्माला तिसऱ्या कसोटीत संधी दिली आहे. मोहम्मद सिराजला दुसऱ्या सामन्यात दुखापत झाली असून तिसऱ्या सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत सिराजच्या जागी उमेश यादव किंवा इशांत शर्माचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. दुसरीकडे, उमेश यादवच्या आधी ईशांतला संघात संधी दिली पाहिजे असे एमएसके प्रसाद आणि माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांचे मत आहे.


हेही वाचा : …अखेर ‘त्या’ प्रकरणात टेनिस स्टार नोवाक जोकोविचचा कायदेशीर विजय