दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी मोठा बदल, राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षक नसणार?

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) नंतर भारतीय संघ दोन महत्वाच्या मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिका आणि त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने याआधीच दोन संघ असल्याची घोषणा केली होती.

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) नंतर भारतीय संघ दोन महत्वाच्या मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिका आणि त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने याआधीच दोन संघ असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता फक्त दोन वेगवेगळे संघच नव्हे, तर दोन्ही टीम्ससाठी स्वतंत्र कोचिंग स्टाफ असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार भारताच्या एका संघाचे प्रशिक्षक द्रविड असणार आहेत, तर दुसऱ्या संघाचे व्हीव्हीएस लक्ष्मण असणार असल्याचे समजतं.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल द्रविड हे सध्या भारताचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. राहुल द्रविड हे कसोटी संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. तसंच, व्हीव्हीएस लक्ष्मण दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड दौऱ्याच्यावेळी संघासोबत असणार आहेत. भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि आर्यलंड विरुद्ध दोन टी-20 सामने होणार आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड दौऱ्यात संघासोबत असतील. विशेष म्हणजे व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे प्रशिक्षक पदासाठी पदार्पण असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार असल्याचे समजते. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती तरुण खेळाडूंना या मालिकेसाठी संधी देईल. तसंच, चेतेश्वर पुजारा कमबॅक करु शकतो. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पुजारा दमदार कामगिरी करतो आहे. पुजाराने तिथे द्विशतक झळकावली आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा संघ जूनमध्ये भारतात येईल. ९ ते १९ जून दरम्यान भारत आफ्रिकेविरुद्ध पाच टी-२० सामने खेळेल. दिल्ली, कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बंगळुरू याठिकाणी दक्षिण आफ्रिका विरुद्धचे सामने होणार आहेत. या मालिकेत अनेक नवोदितांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा समन्वय राखून संघ निवडला जाणार आहे. आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या तिलक वर्मा, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान यांना आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे.

अनुनभवी खेळाडू असलेल्या संघाचं नेतृत्त्व शिखर धवनकडे दिलं जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. या संघात काही अनुभवी खेळाडू असणार आहेत. हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार यांची नावं आघाडीवर आहेत. सूर्यकुमार यादवचा फिटनेस योग्य असल्यास त्याचाही विचार होईल. तर दुसरीकडे इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, चेतेश्वर पुजारा यांची निवड पक्की मानली जात आहे.


हेही वाचा – मुंबई इंडियन्सच्या ‘या’ फलंदाजाचे सुनील गावस्करांनी केले कौतुक; म्हणाले, ‘भारतासाठी सर्व फॉर्मेटमध्ये…’