घर क्रीडा भारताच्या सूर्यकुमार यादवची तुफानी फलंदाजी; 'या' खेळाडूला टाकले मागे

भारताच्या सूर्यकुमार यादवची तुफानी फलंदाजी; ‘या’ खेळाडूला टाकले मागे

Subscribe

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने तुफान फलंदाजी केली आहे. सूर्यकुमारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 8 विकेट्सनी पराभव केला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. मात्र या सामन्यात केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे सूर्यकुमार यादवने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा सूर्यकुमार यादव पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. या कामगिरीसह त्याने भारताचा सलामीवीर शिखर धवनलाही मागे टाकरे आहे. (ind vs sa suryakumar yadav breaks shikhar dhawan record for most t20 runs)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना जास्त धावा करता आल्या नाही. आफ्रिकेचे सुरूवातीचे खेळाडू स्वस्त:त बाद झाले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 107 धावांचे लक्ष्य भारतासमोर ठेवले.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्त:त माघारी परतला. मात्र, त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमारने कोणताही दबाव न घेता आक्रमक फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. यासोबतच सूर्यकुमार यादवनं भारतीय संघाचा स्टार फलंदाज शिखर धवनचा एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवनलाही मागे टाकले.

भारताचा सलामीवीर शिखर धवनने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी 689 धावा केल्या होत्या. तर, सूर्यकुमारने यावर्षी 700 हून अधिक धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहली एका कॅलेंडर वर्षात 4 वेळा भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

- Advertisement -

या सामन्यात अर्शदीप सिंह, दीपक चाहरने भेदक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 106 धावांवर रोखले. त्यानंतर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकाने दिलेले 107 धावांचे लक्ष्य 16.4 षटकांतच पूर्ण केले.


हेही वाचा – दुखापतीमुळे भारताचा डेथ ओवर स्पेशलिस्ट गोलंदाज टी-20 विश्वचषकातून बाहेर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -