घरक्रीडाIND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील मालिकेसाठी तीन वेगवेगळे कर्णधार; बीसीसीआयने...

IND vs SA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील मालिकेसाठी तीन वेगवेगळे कर्णधार; बीसीसीआयने कोणाला दिली संधी?

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. यानंतर, भारतीय संघ पुढील महिन्यात 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दौरा आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला असून टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादव, एकदिवसीय मालिकेसाठी केएल राहुल आणि कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मावर कर्णधार पदाची जबाबदारी सोपविली आहे. (IND vs SA Three different captains for series on South Africa tour BCCI Rohit, Suryakumar Yadav, KL Rahul)

दक्षिण दौरा भारतीय संघाच्या दृष्टिने महत्त्वाचा मानला जात आहे. कारण या मालिकेत अनेक ज्येष्ठ खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ संघासह भारत अ संघही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. यासाठी बीसीसीआयने एकूण 45 खेळाडूंच्या व्हिसासाठी अर्ज केला आहे. ज्यामध्ये क्रीडा कर्मचार्‍यांव्यतिरिक्त, कोचिंग युनिटच्या सदस्यांचाही समावेश असेल.

- Advertisement -

3 टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ 

यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

- Advertisement -

3 एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ 

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार) (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

2 कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील मालिकेचे वेळापत्रक

3 टी-20 सामन्यांची मालिका
पहिला सामना 10 डिसेंबरला,
दुसरा सामना 12 डिसेंबरला
तिसरा सामना 14 डिसेंबरला

3 एकदिवसीय सामन्यांची मालिका
पहिला सामना 17 डिसेंबरला
दुसरा सामना 19 डिसेंबरला
तिसरा सामना 21 डिसेंबरला

2 कसोटी  सामन्यांच्या मालिका
पहिला सामना 26 डिसेंबरपासून
दुसरा सामना 3 जानेवारी 2024 पासून

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -