घरक्रीडाIND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रिषभ पंतला धोनीचा विक्रम मोडण्याची...

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रिषभ पंतला धोनीचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी

Subscribe

टी-२० विश्वचषक आणि न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० मालिकेनंतर रिषभ पंतला कसोटी मालिकेत विश्रांती देण्यात आली होती

टी-२० विश्वचषक आणि न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० मालिकेनंतर रिषभ पंतला कसोटी मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. दरम्यान आगामी दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी पंतचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. पंत दक्षिण आफ्रिकेविरूध्द होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक आणि कर्णधार एम.एस धोनीचा विक्रम मोडू शकतो. कारण पंतने २५ कसोटी सामन्यांमध्ये विकेट्समागून ९७ बळी घेतले आहेत आणि १०० चा आकडा पूर्ण करण्यापासून तो फक्त ३ बळी दूर आहे. त्यामुळे भारतीय विकेटकिपर फलंदाज रिषभ पंतकडे धोनीला मागे टाकण्याची संधी असणार आहे. आताच्या घडीला भारतीय संघासाठी विकेट्समागून सर्वात वेगाने १०० बळी घेण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.

धोनीने ३७ कसोटी सामन्यांत १०० बळी घेतले होते. दरम्यान धोनीने माजी विकेटकिपर किरण मोरेचा ३९ कसोटी सामन्यांतील विक्रम मोडला होता. आता दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत रिषभ पंतकडे धोनीला मागे टाकण्याची संधी असेल. २५ कसोटी सामने खेळलेला पंत माजी कर्णधार धोनीच्या तुलनेत लवकरच त्याचे १०० बळी पूर्ण करू शकतो. रिषभ पंतच्या नावावर ८९ झेल आणि ८ स्टंम्पिंग आहेत. तर महेंद्रसिंग धोनीने त्याच्या पूर्ण कारकिर्दीत ९० कसोटीत २९४ बळी घेतले आहेत. धोनीच्या नावावर ३८ स्टंम्पिंग आणि २५६ झेल आहेत.

- Advertisement -

तर जागतिक पातळीवर विकेटमागून सर्वात जलद १०० बळी घेण्याचा विश्वविक्रम संयुक्तपणे ॲडम गिलक्रिस्ट आणि क्विंटन डिकॉकच्या नावावर आहे. दोन्ही खेळाडूंनी २२ कसोटी सामन्यांत १०० बळींचा आकडा पूर्ण केला आहे. दरम्यान डिकॉकने ३९ डावात तर गिलक्रिस्टने ४३ डावात ही किमया साधली होती.


हे ही वाचा: http://IPL 2022 : ब्रायन लारा-डेल स्टेन सनरायझर्स हैदराबादमध्ये; मिळाली मोठी जबाबदारी

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -