IND vs SA: पराभवानंतर केएल राहुलच्या कॅप्टन्सीवर प्रश्न, रहाणेला संधी देण्याची माजी खेळाडूची मागणी

आयपीएलमध्ये पंजाब टीमचे नेतृत्व केएल राहुलने केले आहेत. त्याच्याकडे भविष्यातील टीम इंडियाचा कर्णधार म्हणूनही पाहिले जाते. परंतु केएल राहुलच्या विरोधात नाही. मात्र असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, जर तुमच्याकडे रहाणेसारखा खेळाडू असेल तर राहुलला संधी देणं अधिक योग्य राहिल. असे वसीम जाफरने म्हटलं आहे.

IND vs SA wasim jaffer said ajinkya rahane to lead team india in 2nd test not happy with k l rahul as captain
IND vs SA: पराभवानंतर केएल राहुलच्या कॅप्टन्सीवर प्रश्न, रहाणेला संधी देण्याची माजी खेळाडूची मागणी

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या कसोटी सामना रोमांचक वळणार पोहोचला आहे. सेंच्युरियनमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या डावात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११३ धावांनी विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ७ गडी बाद करुन विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये १-१ अशी बराबरी झाली आहे. सीरीजचा शेवटचा सामना ११ जानेवारीला केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. या डावात विजय मिळवून सीरीज जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघाकडून करण्यात येईल.

दुसऱ्या कसोटीमध्ये विराट कोहली पाठीच्या दुखण्यामुळे खेळू शकला नाही. तर तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार का याबाबत अद्याप काही माहिती देण्यात आली नाही. मागील सामन्यात कोहलीच्या जागी केएल राहुलला संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली होती. मात्र संघाने हा सामना गमावला असल्यामुळे केएल राहुलच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर भारताचा माजी खेळाडू वसीम जाफने राहुलच्या कॅप्टन्सीवर प्रतिक्रिया दिली आहे.

भारताचा माजी खेळाडू वसीम जाफर म्हणाला की, टीम व्यवस्थापनाने कोहलीच्या अनुपस्थितीमुळे संघाची कमान भारताचा सिनिय फलंदाज अजिंक्य रहाणेला दिली पाहिजे होती. मागील वर्षी ऑस्ट्रेलियामधील ऐतिहासिक सिरीज रहाणेच्या नेतृत्वात भारताने जिंकली होती. रहाणेने आतापर्यंत ज्या सामन्यात संघाचे नेतृत्व केलं आहे. त्यावेळी संघाने चांगली कामगिरी केली आहे. यामुळे केएल राहुलला संघाचे नेतृत्व देण्याच्या निर्णयावर मी आश्चर्यचकित झालो असे वसीम जाफरने म्हटलं आहे.

दरम्यान वसीम जाफर पुढे म्हणाला की, आयपीएलमध्ये पंजाब टीमचे नेतृत्व केएल राहुलने केले आहेत. त्याच्याकडे भविष्यातील टीम इंडियाचा कर्णधार म्हणूनही पाहिले जाते. परंतु केएल राहुलच्या विरोधात नाही. मात्र असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, जर तुमच्याकडे रहाणेसारखा खेळाडू असेल तर राहुलला संधी देणं अधिक योग्य राहिल. असे वसीम जाफरने म्हटलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये तिसरा सामना ११ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. आतापर्यंत विराट कोहलीच्या खेळण्याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नाही. यामुळे संघ कोणत्या प्लेइंग इलेवनसोबत मैदानावर उतरणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा : Ashes 2021-22 : इंग्लंडच्या अडचणीत वाढ, पाचव्या कसोटी सामन्यातून ३ खेळाडू बाहेर?