घरक्रीडाIND vs SL : भारताचा ‘हा’ दुय्यम संघ नाही; अरविंदा डी सिल्वाने...

IND vs SL : भारताचा ‘हा’ दुय्यम संघ नाही; अरविंदा डी सिल्वाने रणतुंगाला सुनावले

Subscribe

भारतीय संघाला पराभूत करणे श्रीलंकेसाठी मोठे आव्हान असेल.

भारतीय संघ या महिन्यात श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या श्रीलंका दौऱ्यासाठी बऱ्याच नवख्या खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असून श्रीलंकेत भारताचा दुय्यम संघ आला आहे, असे विधान काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगाने केले होते. तसेच या संघाविरुद्ध खेळणे हा श्रीलंकन क्रिकेटचा अपमान असल्याची टीका रणतुंगाने केली होती. परंतु, रणतुंगाचा श्रीलंकन संघातील माजी सहकारी आणि श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट समितीचा अध्यक्ष अरविंदा डी सिल्वा या मताशी सहमत नाही.

कोणत्याही संघापेक्षा कमी नाही

भारताच्या या संघाला आपण दुय्यम संघ अजिबातच म्हणू शकत नाही. भारताकडे प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नसून श्रीलंकेत आलेला संघ हा कोणत्याही संघापेक्षा कमी नाही. माझ्या मते, या भारतीय संघाला पराभूत करणे आमच्यासाठी मोठे आव्हान असेल. आम्ही जर या संघाला पराभूत करू शकलो, तर टी-२० वर्ल्डकपपूर्वी आमचा आत्मविश्वास वाढेल, असे डी सिल्वा म्हणाला. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताचा एक संघ आगामी कसोटी मालिकेसाठी सध्या इंग्लंडमध्ये आहे. तर शिखर धवनच्या नेतृत्वात भारताचा मर्यादित षटकांचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला आहे.

- Advertisement -

एकाच देशाचे दोन वेगवेगळे संघ हे भविष्य

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एकाच देशाचे दोन संघ दोन वेगवेगळ्या ठिकाणी खेळवणे भाग पडत असून पुढेही हे सुरु राहू शकेल असे डी सिल्वाला वाटते. बायो-बबलमध्ये राहणे खेळाडूंसाठी मानसिकदृष्ट्या मोठे आव्हान आहे. केवळ भारतच नाही, तर अन्य देशही बऱ्याच खेळाडूंना अधूनमधून विश्रांती देत त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी देत आहेत. एकाच देशाचे दोन वेगवेगळे संघ खेळवणे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट भविष्य असल्याचे मला वाटते, असे डी सिल्वा म्हणाले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -