Eco friendly bappa Competition
घर क्रीडा IND vs SL : भारताच्या विजयानंतर स्टेडियममध्ये राडा; दोन्ही संघाचे चाहते भिडले, व्हिडीओ व्हायरल

IND vs SL : भारताच्या विजयानंतर स्टेडियममध्ये राडा; दोन्ही संघाचे चाहते भिडले, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

IND vs SL : आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील कोलंबोच्या (Colambo) आर प्रेमदासा स्टेडियमवर (R Premadasa Stadium) खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा (IND vs SL) 41 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाने दहाव्यांदा अशी कामगिरी केली आहे. मात्र श्रीलंकेच्या पराभवानंतर स्टेडियममध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. (IND vs SL Cries in the stadium after Indias win Fans of both the teams clashed the video went viral)

हेही वाचा – टीम इंडिया 10 व्यांदा खेळणार आशिया कपची फायनल; अंतिम सामन्यासाठी श्रीलंकेपुढे अडचणी

- Advertisement -

पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर श्रीलंका संघाने भारतीय संघाला अवघ्या 213 धावांवर रोखले, मात्र भारतीय गोलंदाजांनी हार न मानता चांगली गोलंदाजी केली श्रीलंका संघाला 172 धावांवर रोखत 41 धावांनी विजय मिळत दणक्यात अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय संघाला आणखी एक साखळी सामना खेळायचा आहे. शुक्रवारी भारतीय संघ बांग्लादेशविरुद्ध सामना खेळणार आहे. मात्र मंगळवारी पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आधी चाहत्यांमध्ये शिवीगाळ झाली यानंतर धक्काबुक्की झाली. यावेळी श्रीलंकेच्या चाहता भारतीय चाहत्यांवर धावून गेल्याचे पाहायला मिळत आहे. इतर चाहत्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण श्रीलंकेच्या पराभवानंतर त्यांचा चाहता काही ऐकायला तयार नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही वाचा – Dunith Wellalage : श्रीलंकेच्या 20 वर्षीय गोलंदाजाने 5 विकेट घेत मोडला 22 वर्ष जुना विक्रम

भारत-पाकिस्तान सामना पुन्हा होणार?

अंतिम फेरती भारतीय संघाचा सामना कोणत्या संघाशी होणार हा प्रश्नच आहे. 14 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याने याचा निर्णय होईल. कारण दोन्ही संघांचे 2-2 गुण आहेत. त्यामुळे जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान सामना कधीच झालेला नाही. मात्र श्रीलंकेतील कोलंबोमध्ये पाऊस हा सर्वात मोठी अडचण ठरताना दिसत आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुपर फोन सामन्यातही पाऊस पडला तर श्रीलंका आणि पाकिस्तान संघांना 1-1 गुणांचे वाटप करण्यात येईल. अशापरिस्थितीत पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडले. कारण पाकिस्तान संघाचे -1.892 इतक्या रनरेटने तिसऱ्या स्थानावर आहे तर, श्रीलंका संघ -0.200 इकत्या रनरेटने दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे या सामन्यातही पाऊस पडला तर भारत-पाकिस्तान सामना चाहत्यांना पाहता येणार नाही.

- Advertisment -