घरक्रीडाIND vs SL : भारतीय संघाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, मालिकेत 1-0 ने...

IND vs SL : भारतीय संघाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी

Subscribe

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला आहे. अखेरच्या षटकात भारताने दोन धावांनी विजय मिळवला. अक्षर पटेलने टाकलेल्या शेवटच्या जादुई षटकाने भारताला विजय मिळवून दिला. शिवम मावीने पदार्पणातच श्रीलंकेच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला आहे. अखेरच्या षटकात भारताने दोन धावांनी विजय मिळवला. अक्षर पटेलने टाकलेल्या शेवटच्या जादुई षटकाने भारताला विजय मिळवून दिला. शिवम मावीने पदार्पणातच श्रीलंकेच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली. तसेच अष्टपैलू हार्दिक पांड्यानेही संघाच्या कर्णधाराची जबाबदारी उत्तम पार पाडली. विशेष म्हणजे २०२३ वर्षाची सुरूवात भारतीय संघाने विजयाने केली आहे. (India Vs Sri Lanka India Beat Sri Lanka By Two Runs)

भारतीय संघाचा २०२३ मधील पहिला सामना मंगळवार ३ जानेवारी २०२३ रोजी मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात झाली. हार्दिकच्या नेतृत्वातील युवा संघाने श्रीलंकेविरुद्धच्या या टी-२० मालिकेत एक नवीन इतिहास रचला. दिपक हुड्डाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

- Advertisement -

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावली होती. त्यामुळे श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. परिणामी भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. त्यावेळी प्रथम फलंदाजी करत असताना भारताने श्रीलंकेसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्यात भारतीय संघाच्या सलामीवर आणि मधल्या फळीताल खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या पाच विकेट भारताच्या लवकर गेल्या. परंतु, त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांच्या जोडीने सहाव्या विकेटसाठी चिकट खेळी केली.

- Advertisement -

भारतीय संघ एकेवेळी १४.१ षटकात ५ विकेट्स गमावत ९४ धावांवर खेळत होता. त्यावेळी मैदानावर हुड्डा आणि पटेल खेळत होते. या दोघांनीही विकेट न गमावता श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप देण्यास सुरुवात केली. यावेळी या जोडीने नाबाद ६८ धावांची भागीदारी रचली. यावेळी हुड्डाने ३५, तर पटेलने ३१ धावांचे योगदान दिले.

भारतीय संघाने दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला चांगली सुरूवात करता आली नाही. श्रीलंका संघाकडून फलंदाजी करत असताना कर्णधार दसून शनाका याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २७ चेंडूत ४५ धावा केल्या. या धावा करताना त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांची बरसात केली. त्याच्याव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिस याने २८, तर वनिंदू हसरंगा याने २१ धावांचे योगदान दिले.

याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. भारताकडून शिवम मावी सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद विजयात मोलाची साथ दिली. दीपक हुडाने सर्वाधिक ४१ धावा केल्या. इशान किशनने ३७, अक्षरने ३१आणि हार्दिकने २९ धावा केल्या. कासून रजिथा वगळता श्रीलंकेच्या सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.


हेही वाचा – टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल, नवीन ड्रेसमध्ये समोर आला भारतीय खेळाडूंचा फोटो

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -