Eco friendly bappa Competition
घर क्रीडा IND vs SL : पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय फलंदाजांनी केली निराशा; श्रीलंकेसमोर सपशेल...

IND vs SL : पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय फलंदाजांनी केली निराशा; श्रीलंकेसमोर सपशेल लोटांगण

Subscribe

IND vs SL : आशिया चषक सुपर-4 च्या सामन्यात आज (12 सप्टेंबर) भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघ कोलंबोच्या (Colambo) आर प्रेमदासा स्टेडियमवर (R Premadasa Stadium) आमनेसामने आहेत. दोन्ही संघांकडे अंतिम फेरी गाठण्याची मजबूत संधी आहे. मात्र श्रीलंका संघ भारतीय संघावर वरचढ ठरताना दिसत आहे. श्रीलंका संघाने चांगली गोलंदाजी केल्यामुळे भारतीय संघ 213 धावांवर सर्वबाद झाला आहे. (IND vs SL Indian batsmen disappointed after win against Pakistan Sapshel Lotangan in front of Sri Lanka)

हेही वाचा – Asia Cup 2023 : श्रीलंकेविरुद्ध भारताच्या विजयासाठी पाकिस्तानकडून प्रार्थना; हे आहे कारण?

- Advertisement -

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर ड्युनिथ वेल्लालगेने पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलची विकेट घेत भारतीय फलंदाजीला सुरूंग लावला. शुभमन गिल 25 चेंडूत केवळ 19 धावा करून बाद झाल्यानंतर ड्युनिट वेल्लालगेने विराट कोहली (3), रोहित शर्माला (53) बाद करत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले.

- Advertisement -

केएल राहुल आणि इशार किशन यांच्या चौथ्या विकेटसाठी 63 धावांची मजबूत भागिदारी झाली. मात्र ड्युनिथ वेल्लालेजने केएल राहुलला (39) बाद करत भारतीय संघाला आणखी एक धक्का दिला. थोड्या वेळाने इशान किशनला (33) असलंकाने बाद केले आणि त्यानंतर थोड्या थोड्या अंतराने भारताच्या विकेट पडत गेल्या. हार्दिक पांड्या (5), रवींद्र जडेजा (4), जयप्रीत बुमराह (5) आणि कुलदीप यादव आपले खातेही उघडू शकला नाही.

हेही वाचा – IND vs PAK: पराभवानंतर बाबर आझम संतापला, चाहत्यांवर काढला राग ; पाहा व्हिडीओ

अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांच्या शेवटच्या विकेटसाठी 27 धावांची भागिदारी झाली. अक्षर पटेलने मोठे फटके मारताना श्रीलंका गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तो 36 चेंडूंत 1 षटकाराच्या मदतीने 26 धावा करून बाद झाला तर, मोहम्मद सिराज 5 धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेकडून ड्युनित वेलेझने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या तर, चरिथ असलंकाने 4 विकेट घेत चांगली साथ दिली. याशिवाय तीक्ष्णता 1 विकेट मिळाली.

- Advertisment -