घरक्रीडाIND vs SL : धवनच्या टीम इंडियाचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण; सरावाला सुरुवात

IND vs SL : धवनच्या टीम इंडियाचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण; सरावाला सुरुवात

Subscribe

क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली.

शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघाचे श्रीलंकेतील पहिले सराव सत्र शुक्रवारी पार पडले. भारताचे खेळाडू सोमवारी श्रीलंकेत दाखल झाले होते. त्यांना पुढील तीन दिवस क्वारंटाईन व्हावे लागले होते. परंतु, क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी झालेल्या शिखर धवन, तसेच प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळाडूंशी संवादही साधला. भारतीय संघ या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपूर्वी ही भारताची अखेरची मालिका आहे.

नवख्या खेळाडूंची निवड

कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांसारखे भारताचे प्रमुख खेळाडू सध्या आगामी कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात बऱ्याच नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच चेतन साकारिया, कृष्णप्पा गौतम, नितीश राणा, देवदत्त पडिक्कल, वरूण चक्रवर्ती आणि ऋतुराज गायकवाड या सहा याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या सहा खेळाडूंचा या संघात समावेश आहे. हे सर्व खेळाडू शुक्रवारी सराव करताना दिसले.

- Advertisement -

१३ जुलैपासून एकदिवसीय मालिका

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. यापैकी एकदिवसीय सामने हे १३, १६ आणि १८ जुलैला, तर टी-२० मालिकेचे सामने २१, २३ आणि २५ जुलैला होतील. हे सर्व सामने कोलंबो येथे होणार आहे. या दौऱ्यात धवनला पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -