Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा IND vs SL 2nd ODI : मनीष पांडेला पुन्हा संधी; श्रीलंकेची फलंदाजी

IND vs SL 2nd ODI : मनीष पांडेला पुन्हा संधी; श्रीलंकेची फलंदाजी

मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीलंकेला आजचा सामना जिंकावा लागेल.

Related Story

- Advertisement -

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळला जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ७ विकेट राखून विजय मिळवला होता. या विजयासह तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीलंकेला आजचा दुसरा एकदिवसीय सामना जिंकणे अनिवार्य आहे. कोलंबो येथे होत असलेल्या या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसून शानकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेच्या संघात एक बदल करण्यात आला असून इसुरु उदानाच्या जागी वेगवान गोलंदाज कसून रजिथाला संधी देण्यात आली आहे. 

भारतीय संघात बदल नाही 

या मालिकेत जास्तीतजास्त खेळाडूंना संधी देणार असल्याचे भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडने म्हटले होते. परंतु, भारताने संघात बदल करणे टाळले आहे. भारतीय संघ सामना जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेऊ शकेल. फलंदाज मनीष पांडेला पुन्हा संधी देण्यात आली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार शिखर धवन (नाबाद ८६), ईशान किशन (५९), पृथ्वी शॉ (४३) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद ३१) यांनी उत्तम कामगिरी केली होती. मात्र, मनीष पांडे केवळ २६ धावा करून बाद झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करत संघात आपले स्थान पक्के करण्याचा पांडेचा प्रयत्न असेल.

- Advertisement -

- Advertisement -