घरक्रीडाIND vs SA 2nd Test: वॉन्डरर्समध्ये पाच भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला धुरळा, टॉपवर...

IND vs SA 2nd Test: वॉन्डरर्समध्ये पाच भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला धुरळा, टॉपवर रनमशीन कोहली

Subscribe

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आज(सोमवार)पासून सुरूवात झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ११३ धावांनी विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली आहे. मात्र, वॉन्डरर्सच्या मैदानावर टीम इंडियातील पाच क्रिकेटपटूंनी धुरळा उडवला आहे. यामध्ये सर्वात पहिलं नाव रनमशीन विराट कोहलीचं आहे. विराट कोहली दुसऱ्या कसोटीत जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स मैदानावर सात धावा करत या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू ठरला आहे. सध्या हा विक्रम न्यूझीलंडच्या जॉन रीडच्या नावावर आहे. त्यानेही ३१६ धावा केल्या आहेत. कोहलीने दुसऱ्या सामन्यात ७७.५० च्या सरासरीत ३१० धावा काढल्या आहेत. तसेच त्याने एक शतक सुद्धा झळकावलं आहे.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड

टीम इंडियाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही वॉन्डरर्समध्ये सर्वाधिक धावा काढल्या आहेत. सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम राहुल द्रविड यांच्या नावावर आहे. राहुल द्रविडने आपल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दौऱ्यात सर्वाधिक धावा काढल्या आहेत. २ कसोटी सामन्यात ६५.५० च्या सरासरीत २६२ धावा बनवल्या आहेत. तर एक शतकंही केलं आहे.

- Advertisement -

वेगवान फलंदाज चेतेश्वर पुजारा

विराट कोहली आणि राहुल द्रविड या दोन क्रिकेटपटूंनंतर टीम इंडियाचा वेगवान फलंदाज चेतेश्वर पुजाराचं नाव तिसऱ्या क्रमाकांवर आहे. पुजाराने दोन कसोटी सामन्यात ५७.२५ च्या सरासरीत २२९ धावा काढल्या आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर

टीम इंडियातून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम द्रविडने केल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चौथ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरने १५ कसोटीत १ हजार १६१ इतक्या धावा केल्या आहेत. मात्र, वॉन्डरर्समधील तीन कसोटी सामन्यात सचिनने ३५.६६ च्या सरासरीत २१४ धावा काढल्या आहेत.

- Advertisement -

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली

टीम इंडियाचे पाचवे क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचं नाव आहे. वॉन्डरर्सच्या मैदानात सौरवने कसोटी सामना रंगवला आहे. २ कसोटी सामन्यात ६९ च्या सरासरीत एकूण २०९ इतक्या धावा काढल्या आहेत.

दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी हे मैदान फार लकी ठरले आहे. २०१८ मध्ये विराटने ५४ आणि ४१ धावा काढल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियाचा विराट विजय झाला होता.


हेही वाचा : Raju Karemore Arrest : पोलिसांना शिवीगाळ करणं पडलं भारी, राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -