घरक्रीडा#IND vs WI 1st ODI: विंडीजविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला मिळाली संधी?

#IND vs WI 1st ODI: विंडीजविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला मिळाली संधी?

Subscribe

वेस्ट इंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये एक कसोटी मालिका खेळवण्यात आली असून भारताने ती जिंकली होती. आता दोन्ही संघांमध्ये पाच वन डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. गुवाहाटी येथे पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार असून या सामन्यासाठी अंतिम १२ खेळाडुंच्या यादीत ऋषभ पंतचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंतला वेस्ट इंडिजविरूद्ध खेळण्याची संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. २१ ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या हा सामना खेळवला जाणार आहे.

भारतीय संघाने नुकताच आशिया कप जिंकला आहे. त्यामुळे आशिया कप जिंकणारा भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी खेळवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु त्यामध्ये आता बदल करण्यात आले आहेत. गुवाहाटी येथे होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठीच्या अंतिम १२ खेळाडुंच्या यादीत यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्याच्याऐवजी महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत या दोघांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

ही तर वर्ल्ड कपची तयारी

२०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपची तयारी भारतीय संघ सध्या करत आहे. त्यामुळे वर्ल्डकपपूर्वी ऋषभला जास्तीत जास्त अनुभव मिळावा म्हणूनही त्याला या संघात स्थान देण्यात आलो आहे. शिवाय यष्टीरक्षक धोनीला पर्याय निर्माण व्हावा म्हणूनही ऋषभला भारतीय संघात नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -