घर क्रीडा IND Vs WI 5th T20 : जेतेपदासाठी भारत आणि वेस्ट इंडिज आमनेसामने;...

IND Vs WI 5th T20 : जेतेपदासाठी भारत आणि वेस्ट इंडिज आमनेसामने; कोण मारणार बाजी?

Subscribe

IND Vs WI 5th T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज निर्णायक आणि अखेरचा टी-20 सामना फ्लोरिडा येथील लॉडरहिलच्या सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर खेळला जाणार आहे. पाच सामन्याच्या टी-20 मालिकेत दोन्ही संघ 2-2 ने बरोबरीत आहेत. त्यामुळे कोणता संघ टी-20 मालिका खिशात घालणार हे पाहावे लागेल. (IND Vs WI 5th T20 India and West Indies face off for the title Who will kill the bet)

पाच सामन्याच्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिज संघाने पहिले दोन सामने जिंकत मालिकेत आघाडी घेतली होती, मात्र भारतीय संघाने तिसरा आणि चौथा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. भारतीय संघातील सलामीवीर शुभमन गिल आणि यशस्वी जायस्वाल यांनी जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माही चांगला खेळ करत आहेत. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यांच्या यांच्या फिरकी माऱ्याला अर्शदीप आणि मुकेश कुमार हे वेगवान गोलंदाज चांगली साथ देत आहेत. असे असले तरी कर्णधार हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि संजू सॅमसन यांच्या फॉर्माची चिंता कायम आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात भारतीय संघ टी-20 मालिका जिंकणार का हे पाहावे लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – चक दे इंडिया; भारतीय हॉकी संघानं मलेशियाचा पराभव करत आशियाई विश्वचषकावर कोरलं नाव

दुसरीकडे वेस्ट इंडिज संघही टी-20 मालिक जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सलामीवीर काइल मायर्स आणि मधल्या फळीतील निकोलस पूरन, शाय होप, शिमरोन हेटमायर आणि रोवमन पॉवेल चांगल्या फॉर्मात आहेत. गोलंदाजीतही अनुभवी खेळाडू आहेत. त्याशिवाय वेस्ट इंडिजकडे तळापर्यंत फलंदाज असल्यामुळे आजचा सामना रंगतदार होणार यात शंका नाही. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

फ्लोरिडामध्ये हवामान परिस्थिती कशी?

- Advertisement -

फ्लोरिडा येथे होणार पाचव्या टी-20 सामन्यात हवामान खूपच चढउतार असणार आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान हवामान स्वच्छ होते आणि उष्णता असूनही पाऊस पडला नव्हता. त्यामुळे आजही याठिकाणी हवामान उष्ण आणि दमट राहील. पावसाची शक्यता 10 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने चाहत्यांना पूर्ण सामना पाहायला मिळणार आहे. हवामानाची आर्द्रता सुमारे 70 टक्के असू शकते. अशा स्थितीत चाहत्यांना अटीतटीच्या सामन्याची अपेक्षा असेल.

हेही वाचा – जयस्वाल आणि गिलचा झंझावात; 9 विकेटने भारताचा विंडिजवर विजय, मालिकेत 2-2 ची बरोबरी

टी-20 मालिकेसाठी संघ

भारत – हार्दिक पांड्या (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिजय – रोवमॅन पॉवेल (कर्णधार), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.

- Advertisment -