घरक्रीडाIND vs WI : इंग्लंडनंतर आता वेस्ट इंडिजचे संघाचे मिशन 'टीम इंडिया',...

IND vs WI : इंग्लंडनंतर आता वेस्ट इंडिजचे संघाचे मिशन ‘टीम इंडिया’, पाहा वेळापत्रक

Subscribe

मुख्य निवडकर्ता डेसमंड हेन्स म्हणाले की, या संघाने इंग्लंडविरोधात त्यांच्या देशात टी२० मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. यामुळेच या संघासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताला पुढील महिन्यात देशांतर्गत वेस्ट इंडिजविरुद्ध ३ एकदिवसीय सामने आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांची घोषणा देखील करण्यात आली आहे. इंग्लंडला टी-२० मालिकेत २-१ अशा फरकाने पराभव करणारी कॅरेबियाई टीम सामन्यासाठी भारतात येणार आहे. कायरन पोलार्डच्या नेतृत्वात १६ सदस्यांच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. पोलार्डशिवाय फैबियन एलेन, डेरेन ब्राव्हो, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसैन, ब्रेंडन किंग, निकोलस पूरण, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ आणि हेडन वॉल्श जूनियरला एकदिवसीय आणि टी२० अशा दोन्ही संघांत सामील करण्यात आले आहे.

तंदुरुस्तीच्या कारणास्तव शिमरोन हेटमायरची संघात निवड करण्यात आली नाही. या महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमंसने तंदुरुस्तीच्या कारणामुळे हेटमायरच्या वागणूकीवर नाराजी दर्शवली होती. मुख्य निवडकर्ता डेसमंड हेन्स म्हणाले की, या संघाने इंग्लंडविरोधात त्यांच्या देशात टी२० मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. यामुळेच या संघासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

भारत- वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका वेळापत्रक

६ फेब्रुवारी – पहिला एकदिवसी सामना, अहमदाबाद
९ फेब्रुवारी – दुसरा एकदिवसीय सामना, अहमदाबाद
११ फेब्रुवारी – तिसरा एकदिवसीय सामना, अहमदाबाद

भारत-वेस्ट इंडिज टी२० मालिका वेळापत्रक

१६ फेब्रुवारी – पहिला टी२०, कोलकाता
१८ फेब्रुवारी – दुसरा टी२०, कोलकाता
२० फेब्रुवारी – तिसरा टी२०, कोलकाता

- Advertisement -

हेही वाचा : Australian Open 2022: राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपन 2022 जिंकत रचला इतिहास, बनवला विश्वविक्रम

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -