घरक्रीडाIND vs WI: युजवेंद्रची जागा घेऊ शकतो रवी बिश्नोई, दिनेश कार्तिकने सुचवला...

IND vs WI: युजवेंद्रची जागा घेऊ शकतो रवी बिश्नोई, दिनेश कार्तिकने सुचवला पर्याय

Subscribe

चहलच्या गोलंदाजीची आकडेवारी सांगते की त्याचे वर्ष चांगले गेले नाही. पण संघात स्थान मिळवण्यासाठी कोणीही जोर लावत नसल्याने तो अनेक बाबतीत भाग्यवान ठरला आहे.

भारताचा दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिकने युवा अनकॅप्ड भारतीय स्पिनर रवी बिश्नोईला एक दिवसीय संघात स्थान मिळवून देण्यासाठी सीनियर लेग स्पिनर युजवेंद्र चहलला आव्हान देण्यासाठी समर्थन दिले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये युझवेंद्र चहलला गोलंदाजीमध्ये पर्याय नसल्यामुळे फलंदाजांना फारसे त्रास देता आलेला नाही.

एकदिवसीय विश्वचषक २०१९ स्पर्धेपूर्वीच्या काळात भारतासाठी चहलने ५३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७८ गडी बाद केले आहेत. तर मेगा इव्हेंटनंतर चहलची कामगिरी घसरली आहे. या फिरकीपटूने आता ९ सामन्यांमध्ये फक्त १४ गडी बाद केले आहेत. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तीन एकदिवसीय सामन्यात चहलने १४७ धावा देत फक्त दोन गडी बाद केले होते.

- Advertisement -

भारताचा दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिकने एका मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे की, चहल भाग्यवान आहे. कारण स्पिनर शोधण्यात येणाऱ्या अडचणींमुळे तो संघात राहिला आहे. परंतु दिनेश कार्तिकला वाटत आहे की, भविष्यात भारतीय संघाकडे चहलशिवाय राहुल चाहर आणि बिश्नोईच्या रुपात दोन आणखी लेग स्पिनरचा पर्याय आहे. परंतु जाहरने गेल्या वर्षीच्या टी-२० सामन्यानंतर पुनरागमन केलं नाही. बिश्नोईची वेस्ट इंडीजविरोधातील मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. ही मालिका ६ फेब्रुवारीपासून भारतामध्ये सुरु होणार आहे.

दिनेश कार्तिक पुढे म्हणाला की, चहल व्यतिरिक्त, जर तुम्हाला लेग-स्पिनर निवडण्याची संधी मिळाली तर ते राहुल चहर आणि रवी बिश्नोई आहेत. मला वाटत आहे की बिश्नोई या क्षणी आघाडीवर आहे. पण चहल किती वाईट गोलंदाजी करतो हे पाहावे लागेल. चहलच्या गोलंदाजीची आकडेवारी सांगते की त्याचे वर्ष चांगले गेले नाही. पण संघात स्थान मिळवण्यासाठी कोणीही जोर लावत नसल्याने तो अनेक बाबतीत भाग्यवान ठरला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Australian Open Final : मेदवेदेवची पहिल्या दोन सेटमध्ये नदालवर मात, ग्रँड स्लॅम दुसऱ्यांदा जिंकण्याच्या तयारीत

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -