IND vs WI : भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची घोषणा, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळवले जाणार

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका खेळणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका खेळणार आहे. इंडियन प्रिमीयर लीगनंतर (IPL 2022) भारतीय संघाच्या (Indian Cricket Team) इतर देशाच्या क्रिकेट संघासोबत अनेक मालिका होणार आहेत. यामधील पहिली मालिका भारतीय संघ दक्षिण आफ्रिकासोबत (South Africa) खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (West Indies) सोबत खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मलिकांसाठी भारतीय संघाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती.

दक्षिण आफ्रिकेच्या भारतीय दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघ जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौरा (West Indies Tour) करणार आहे. या दौऱ्यामध्ये 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी आगामी काळात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या सरावासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच, अनेक युवा खेळाडूंना यामध्ये स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बरेच नवे आणि उत्तम खेळाडूम भारतीय संघाचे भविष्य बनू शकतात.

हेही वाचा – T20 World Cup : माजी खेळाडू आकाश चोप्राने निवडला भारतीय संघ; ‘या’ प्रमुख खेळडूंना वगळले

भारताचा वेस्ट इंडिज दौरा

  • पहिली वनडे, 22 जुलै, त्रिनिदाद
  • दुसरी वनडे, 24 जुलै, त्रिनिदाद
  • तिसरी वनडे, 27 जुलै, त्रिनिदाद
  • पहिली टी-20, 29 जुलै, त्रिनिदाद
  • दुसरी टी-20, 1 ऑगस्ट, सेंट किट्स
  • तिसरी टी-20, 2 ऑगस्ट, सेंट किट्स
  • चौथी टी-20, 6 ऑगस्ट, फ्लोरिडा
  • पाचवी टी-20, 7 ऑगस्ट, फ्लोरिडा

वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरूवात वनडे सीरिजने होणार आहे. पहिला सामना 22 जुलैला त्रिनिदादमध्ये होईल, तर अखेरची मॅच 7 ऑगस्टला फ्लोरिडामध्ये खेळवली जाणार आहे. टी-20 सीरिजच्या अखेरच्या दोन सामने अमेरिकेच्या फ्लोरिडामध्येच होणार आहेत.

टी-20 वर्ल्ड कप 2024 चे आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे, त्यामुळे इकडे सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान, आयपीएलनंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 5 टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला 9 जूनपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी कोहली, रोहित आणि बुमराह या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, यानंतर टीम इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.


हेही वाचा – बीसीसीआय अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरुन सौरव गांगुलीचा खुलासा, म्हणाला…