घरक्रीडासलामीवीर शुभमन गिलचे वनडेत पहिले अर्धशतक, सचिन तेंडुलकरचा मोडला 'तो' विक्रम

सलामीवीर शुभमन गिलचे वनडेत पहिले अर्धशतक, सचिन तेंडुलकरचा मोडला ‘तो’ विक्रम

Subscribe

भारतीय संघ (Indian Cricket Team) सध्या वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर असून यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. तीन वनडे (ODI) सामन्यांच्या मालिकेती पहिला सामना शुक्रवारी झाला. या सामन्यात भारताने ३ धावांनी वेस्ट इंडिजला पराभूत केले.

भारतीय संघ (Indian Cricket Team) सध्या वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर असून यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. तीन वनडे (ODI) सामन्यांच्या मालिकेती पहिला सामना शुक्रवारी झाला. या सामन्यात भारताने ३ धावांनी वेस्ट इंडिजला पराभूत केले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ३०८ धावा केल्या. यात कर्णधार शिखर धवन, शुभमन गिल (Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी केली. यामधील शुभमन गिलचे अर्धशतक त्याच्या वनडे कारकिर्दीतले पहिले अर्धशतक ठरले आहे. (ind vs wi odi series shabman gill breaks sachin Tendulkar record become youngest Indian west indies)

सलामीवीर शुभमन गिलने पहिल्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याचे हे अर्धशतक वनडे क्रिकेट कारकिर्दीतील पहिले ठरले. या अर्धशतकी खेळीसह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा (Sachin Tendulkar) एक विक्रम मोडीत काढला आहे. वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करत भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत सचिनला मागे टाकले आहे.

- Advertisement -

शुभमन गिलने २२ वर्षे ३१७ दिवस वय असताना पहिलं अर्धशतक केलं आहे. याआधी सचिनने वेस्ट इंडिजमध्ये वयाच्या २४ व्या वर्षी अर्धशतक केलं होते. याशिवाय, शुभमन गिलने सचिनला मागे टाकले असले तरी त्याच्यापुढे विराटचे नाव या यादीत अव्वल आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने २०१० मध्ये २२ वर्षे २०१५ दिवस इतके वय असताना वेस्ट इंडिजमध्ये अर्धशतक केले होते. त्यावेळी विराट कोहली सर्वात अव्वल होता.

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ३०५ धावा करता आल्या. या विजयासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी मिळवली आहे. शुभमन गिलने पहिल्या वनडे सामन्यात ६४ धावांची खेळी केली होती.

- Advertisement -

शुभमन गिलने आतापर्यंत केवळ तीनच वनडे सामने खेळले आहेत. त्याने ३१ जानेवारी २०१९ रोजी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २ डिसेंबर २०२० मध्ये याआधीचा वनडे सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. आता वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर दीड वर्षानंतर त्याला संघात संधी मिळाली आहे.


हेही वाचा – आगामी टी 20 वर्ल्ड कपआधी भारतीय संघ दोन संघांसोबत मालिका खेळणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -