घरक्रीडाVideo: भारताची दयनीय अवस्था होती आणि मग मैदानात कुत्र्याची एंट्री झाली

Video: भारताची दयनीय अवस्था होती आणि मग मैदानात कुत्र्याची एंट्री झाली

Subscribe

क्रिकेट सामना सुरु असताना आपल्या आवडत्या क्रिकेटरसोबत सेल्फी घेण्यासाठी काही चाहते थेट मैदानात शिरल्याच्या बऱ्याच घटना याअगोदर घडल्या आहेत. मात्र, एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना सुरु असताना मैदानात कुत्रा शिरण्याची पहिलीच घटना आज भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या वनडे सामन्या दरम्यान बघायला मिळाली. हा कुत्रा सुरुवातीला बॉन्ड्री लाईनवरच होता. मात्र, नंतर त्याने थेट मैदानात प्रवेश केला. त्याला खेळाडूंनी पकडण्याचा प्रयत्नही केला तेव्हा तो कुत्रा मैदानाबाहेर पळून गेला. या घटनेनंतर प्रक्षेकांमध्ये प्रचंड हास्यकल्लोळ उडाला. आता तर सोशल मीडियावर देखील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. विशेष म्हणजे हा सामना सुरु असताना २६ वी ओव्हर सुरु होती आणि भारतने तीन विकेट्स गमावलेल्या होत्या. दरम्यान, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर तग धरुन फलंदाजी करत होते आणि अचानक मैदानात कुत्र्याची एंट्री झाली.

- Advertisement -

नेमके काय घडले?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना सुरु आहे. भारतीय संघ फलंदाजी करत असून २६ वी ओव्हर सुरु होती. भारताचे फलंदाज ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर मैदानावर स्टान्स घेऊन उभे होते. ते दोन्ही पुढच्या बॉलसाठी सज्ज झालेत. वेस्ट इंडिजचा गोलंदाज किमो पॉल गोलंदाजी करण्यासाठी रणअपला सुरुवात करणार आणि अचानक मैदानात एक काळा कुत्रा शिरला. हा काळा कुत्रा शिरताच क्षणी प्रेक्षकांनी जोरजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. सुरुवातीला हा कुत्रा बॉन्ड्री लाईनवरच फिरत होता. नंतर मात्र, तो थेट मैदानात शिरला. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पुन्हा बॉन्ड्रीच्या दिशेने जावून मैदानाबाहेर गेला. या घटनेमुळे काही क्षणांसाठी का असेना पण सामना थांबला होता. हा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियम येथे खेळला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Video : मैदानात साप घुसल्यामुळे क्रिकेट मॅच थांबवावी लागली!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -