भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T- 20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना फ्लोरिडा येथे खेळवला गेला. वर्ल्ड कप आधी महत्वाची मानली जाणारी ही मालिका बरोबरीत असल्यानं हा सामना निर्णायक होता. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळावर भारतानं वेस्ट इंडिजसमोर 166 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चौकार, षटकार मारले आणि 18 व्या षटकातच एक षटकार मारत इंडिजनं ही मालिका खिशात घातली. ( IND Vs WI West Indies won the series T-20 India lost the series 3 2 )
भारतानं दिलेल्या 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाची सुरूवात खराब झाली. अवघ्या 12 धावांवर काईल मायर्सच्या रुपानं पहिला धक्का बसला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या निकोलस पुरननं भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पूरन याने अखेरच्या दोन डावातील अपयश विसरून सकारात्मक फलंदाजी केली.
पूरनने अर्शदीप सिंहच्या पहिल्याच षटकात षटकार ठोकला. त्यानंतर हार्दिक पंड्याच्या षटकात सलग दोन षटकार मारून धावसंख्या वेगानं वाढवली. पूरन आणि किंग यांनी मिळून संघाची धावसंख्या पहिल्या 6 षटकात 1 गडी गमावून 61 पर्यंत नेली. पूरन आणि किंग यांनी विंडिजची धावसंख्या वेगानं वाढवली. पावसामुळे सामन्यात व्यत्यय येत होता. खराब हवामानामुळे 12.3 षटकांनंतर सामना थांबवण्यात आला तेव्हा विंडिज संघाची धावसंख्या 1 गडी गमावून 117 धावा होत्या. यानंतर खेळ सुरू होताच, विंडिज संघाला पूरनच्या रुपाने धक्का बसला. पूरन 47 धावांवर तिलक वर्माचा बळी ठरला.
निकोलस पूरन परतल्यानंतर ब्रँडन किंगला साथ देण्यासाठी मैदानात आलेल्या शाई होपने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. ब्रँडन किंगनेही दुसऱ्या बाजूने धावा काढल्या. किंगच्या फटकेबाजीच्या बळावर विडिंजने 18 व्या षटकांत सामना जिंकला. ब्रँडन किंगने 85 धावांची नाबाद खेळी केली तर होपनेही 22 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि तिलक वर्मा यांनी 1-1 विकेट्स घेतली.
( हेही वाचा: World Cup 2023 : अंतर्गत वादामुळे ICC ट्रॉफी जिंकण्यात भारतीय संघ अपयशी; माजी खेळाडूचा दावा )
वेस्ट इंडिज विरुद्धचा भारतीय संघ आता आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी तीन T-20 सामने असणार आहेत. पहिला सामना 18 ऑगस्ट तर दुसरा 20 ऑगस्ट आणि तिसरा सामना 23 ऑगस्टला होणार आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठी T-20 संघ
जसप्रीत बुमराह (C). ऋतुराज गायकवाड (VC), यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, डब्ल्यू सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.