Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND Vs WIN ODI: दुसऱ्या वन-डे साठी भारतीय संघ जाहीर

IND Vs WIN ODI: दुसऱ्या वन-डे साठी भारतीय संघ जाहीर

Related Story

- Advertisement -

वेस्ट इंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये एक कसोटी मालिका खेळवण्यात आली असून भारताने ती जिंकली होती. आता दोन्ही संघांमध्ये पाच वन डे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांनी दमदार शतके साजरी केली. रोहितने तर नाबाद दिडशतकी टप्पा पार केला. तर कोहलीचे हे शतक त्याच्या कारकिर्दीतले ३६ वे शतक ठरले. आता उभय संघांमधला दुसरा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. विशाखापट्टणम येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी भारताचा संघ बीसीसीआयने जाहीर केला आहे.

असा असेल भारतीय संघ

- Advertisement -

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, एम. एस. धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, उमेश यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद


हे सुद्धा वाचा – ‘होय! २०११ची भारत – इंग्लंड लॉर्डस कसोटी फिक्स होती’

- Advertisement -

 

- Advertisement -