Eco friendly bappa Competition
घर क्रीडा CWG 2022 : ऑस्ट्रेलियाचा 'सुवर्ण' विजय, तर भारतीय संघ ठरला रौप्यपदकाच्या मानकरी

CWG 2022 : ऑस्ट्रेलियाचा ‘सुवर्ण’ विजय, तर भारतीय संघ ठरला रौप्यपदकाच्या मानकरी

Subscribe

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी टी-20 चा अंतिम सामना झाला.

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी टी-20 चा अंतिम सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने 9 धावांनी विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले.

यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच महिलांच्या टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला असून, सुवर्णपदक जिंकणारा ऑस्ट्रेलिया महिला संघ पहिला ठरला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारता समोर 20 षटकांत 162 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करनाता भारतीय संघ 19.3 षटकांत 152 धावा करत सर्वबाद झाला. त्यामुळे भारतीय महिला संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगली सुरूवात करता आली नाही. सलामीवीर स्मृती मंधाना 6 तर शेफाली वर्मा 11 धावांवर बाद झाली. त्यानंतर आलेल्या जेमिमाह रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने भारतीय संघाचा डाव सावरला.

- Advertisement -

दोघींनी चौफेर फटकेबाजी करत भारताला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. हरमनप्रीत कौरने 43 चेंडूत 65 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर जेमिमाहने 33 चेंडूत 33 धावा केल्या. मात्र, त्या दोघी बाद झाल्यानंतर एकही भारतीय खेळाडू मैदानावर टीकू शकला नाही.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. संघाची धावसंख्या 9 असताना सलामीवीर अॅलिसा हेली बाद झाली. यानंतर बेथ मूनी आणि कर्णधार लॅनिंगने दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, ऑस्ट्रेलियन कर्णधार 36 धावांवर धावबाद झाली. ताहलिया मॅकग्राही पुढच्याच षटकात बाद झाली.

भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियाला ठराविक अंतरानंतर आपले गडी गमवावे लागेल. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 161 धावा केल्या. सलामीवीर बेथ मुनीने सर्वाधिक 61 धावा केल्या.


हेही वाचा –  महिलांच्या भालाफेक स्पर्धेत देशाला कांस्यपदक, अन्नू राणीची उत्कृष्ट कामगिरी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -