घरक्रीडाभारत ‘अ’ संघाची ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघांवर मात

भारत ‘अ’ संघाची ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघांवर मात

Subscribe

फिरकीपटू कुलदिप यादवच्या शानदार फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचे बॅट्समनची दांडी गुल झाली आहे. भारताने दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्सने विजय मिळवला.

ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ भारताच्या दौऱ्यावर आला असून भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. ज्यातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ९८ धावांनी विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय बॉलर्सच्या अप्रतिम बॉलिंगमुळे भारताने तब्बल ६ विकेट्सने विजय मिळवत मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली. कुलदीप यादव आणि कृष्णप्पा गौतम या भारतीय बॉलर्सनी सामन्यात विशेष कामगिरी केली.

अशी पार पडली कसोटी

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या डावात अप्रतिम बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाने ३४६ धावांचा डोंगर भारतासमोर रचला. त्यानंतर भारताने बॅटिंग करताना ५०५ धावा करत ऑस्ट्रेलियाला चांगलाच आव्हान दिला. ज्याचा पाठलाग करत असताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या २१३ धावात संपला आणि भारताला विजयासाठी दुसऱ्या डावात केवळ ५५ धावांची गरज होती. यावेळी भारताचे सलामीवीर लगेचच बाद झाले मात्र अंकित बावणेच्या नाबाद २८ धावांच्या जोरावर भारताने चार विकेट्स गमावत ५५ धावा केल्या आणि कसोटीत विजय मिळवला.

- Advertisement -

कुलदिपच्या दोन डावात ८ विकेट्स

फिरकीपटू कुलदिप यादवने कसोटीच्या दोन्ही डावात अप्रतिम बॉलिंग केली. पहिल्या डावात कुलदिपने ऑस्ट्रेलियाच्या अर्ध्या संघाला बाद करत ५ विकेट्स आपल्या नावे केल्या तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा विकेटीकिपर हेंड्सकॉम्बचा महत्त्वाचा विकेट घेत ३ विकेट आपल्या नावे केल्या. कुलदिपच्या अप्रतिम बॉलिंगमुळे भारताला दोन्ही डावात ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनना रोखनं शक्य झाला. कुलदिप सोबतच कृष्णप्पा गौतमने देखील दोन डावात घेतलेल्या ४ विकेट्सनेही भारताला चांगलाच फायदा झाला.

kuldeep-yadav
कुलदीप यादव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -